‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By Admin | Updated: February 28, 2016 02:16 IST2016-02-28T02:16:00+5:302016-02-28T02:16:00+5:30

हिवरा (का.) या पुलाचे बांधकाम सुरू असतानी वळण रस्ता करण्यात आला. त्या रस्त्याला पाणी असल्याने ...

Waiting to compensate the 'those' farmers | ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

पुलाच्या बांधकामामुळे गेली होती पिके वाहून
विजयगोपाल : हिवरा (का.) या पुलाचे बांधकाम सुरू असतानी वळण रस्ता करण्यात आला. त्या रस्त्याला पाणी असल्याने पुलाच्या आजुबाजुला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गेले. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.
जुलै २०१५ रोजी मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसामुळे विजयगोपाल येथील नाल्याला पूल आला व नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. यात उभी पिके वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिवरा व तांभा येथील पुलाचे काम दीड वर्षापासून रखडले होते. त्या नाल्याचे काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने पाणी अडविले होते. पाणी अडविल्याने बाजूच्या गितेशसिंग धुमाळे, पांडुरंग डगवार, प्रकाश नानोटी व अन्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. परिणामी, ऊस व अन्य पिके वाहून गेली. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी मौका पंचनामा करून तत्सम अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला. तहसीलदारांनी माहिती उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पुलगाव यांच्याकडे पाठविली; पण तहसीलदारांच्या पत्राला उपविभागीय अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. आमच्यामुळे शेताचे नुकसान झाले नाही, असा पवित्रा घेतल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)

Web Title: Waiting to compensate the 'those' farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.