शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विषय शिक्षकांना पदोन्नती पण पदस्थापनेसाठी 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:21 IST

आचारसंहितेमुळे अडचण : विद्यार्थ्यांचे होताहेत शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनासह प्रशासनाकडूनही जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा खेळखंडोबा चालवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गणित-विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने नुकतेच २९ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. पण, आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेचे कारण सांगून या शिक्षकांची पदस्थापना रोखण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणवेशापासूनच, तर शिक्षकांच्या संख्येपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असा गोंधळ कायम असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा तगादा लावल्या जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये वर्ग सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गाकरिता गणित विज्ञान विषय शिक्षकांच्या जवळपास ७२ जागा बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे नुकताच बीएसी उत्तीर्ण झालेल्या २९ सहायक शिक्षकांचे १५ दिवसांपूर्वी समुपदेशन घेऊन पदोन्नती देण्यात आली. अर्धे सत्र उलटले, तरीही विषय शिक्षक नसल्याने आता तरी विद्यार्थ्यांना विषय शिक्षक मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, पदोन्नतीचे आदेशच उशिराने निघाले. त्यातच आचारसंहिताही लागल्याने आता पदस्थापनेचे काम रखडले असून, आचारसंहिता संपेपर्यंत शाळांना विषय शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत आणखी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीची झळ सोसावी लागणार असल्याने रोष व्यक्त होत आहे. 

अध्ययन-अध्यापनात अडथळा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणित-विज्ञान विषयाच्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शाळांतील शिक्षकांकडूनच या विषयाचे धडे दिल्या जात आहे. आता अर्धे सत्र संपत आले तरीही नियुक्ती न मिळाल्याने अध्ययन-अध्या- पनात अडचणी निर्माण होत आहे.

"जिल्ह्यामध्ये एकूण विषय शिक्षकांच्या ७२ जागा रिक्त असून, नुकतेच २९ विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, परंतु सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या शाळांतून कार्यमुक्त करणे सोयीचे ठरणारे नाही. त्यामुळे आचारसंहिता संपतेपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही. "- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षण