वर्धेत ‘डोअर टु डोअर’ जागर,

By Admin | Updated: January 7, 2016 02:42 IST2016-01-07T02:42:33+5:302016-01-07T02:42:33+5:30

‘दर गुरूवार नो व्हेईकल डे’ बघता-बघता तिसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचला तर देवळीकरांसाठी दुसरा गुरूवार आहे. ...

Wager, 'Door to Door' Jagar, | वर्धेत ‘डोअर टु डोअर’ जागर,

वर्धेत ‘डोअर टु डोअर’ जागर,

देवळीत दुसरा गुरुवार तर वायगाव येथे प्रारंभ
आज नो व्हेईकल डे : पुलगावातही हालचाली
वर्धा : ‘दर गुरूवार नो व्हेईकल डे’ बघता-बघता तिसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचला तर देवळीकरांसाठी दुसरा गुरूवार आहे. अशातच वायगाव (नि.)या गावानेही हा दिवस पाळण्याचा निर्धार केला आहे. आर्वी व पुलगाव येथेही हालचालींना प्रारंभ झाला आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘इनिशिएटिव्ह’ला वर्धा जिल्हावासियांकडून वाढता प्रतिसाद बघता जिल्ह्यात ‘दर गुरूवार नो व्हेईकल डे’ होण्याबाबतचे संकेत असल्याचे एकंदर चित्र आहे.
‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’बाबत ‘इनिशिएटिव्ह’ घेताच वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तीने दर गुरूवारी हा दिवस पाळण्याचा निर्धार केला आणि तो पाळणे सुरूही केले. या मोहिमेत शहरातील सर्वच ६६ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेत सक्रिय सहभाग घेतला. दुसऱ्या आठवड्यापासून या मोहिमेत जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल व जि.प. मुख्य अधिकारी संजय मीना यांनी पुढाकार घेत हा दिवस पाळणे सुरू केले. वर्धेतील शिक्षण संस्थांनीही सहभाग घेत हा दिवस पाळणे सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. याच दिवसापासून खा. रामदास तडस यांनी पुढाकार घेत देवळीतही हा दिवस पाळणे सुरू केले. यानंतर आर्वी पुलगाव ही दोन्ही शहरे हा दिवस पाळण्याच्या निर्णय प्रक्रियेत आहेत. वर्धेपासून ११ किमीवरील वायगाव (नि.) येथील स्व. भैय्यासाहेब उरकांदे महाविद्यालय, महावितरण, पोलीस चौकी, यशवंत विद्यालय व श्रीराम युवा सेना यांनी पुढाकार घेत गुरुवारपासून (दि.७) हा दिवस पाळणार आहे. हे पहिले गाव ठरणार आहे. एकूणच ही मोहीम आता जिल्हा वासियांच्या सुदृढ आरोग्याची चळवळ झालेली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

प्रदूषणजन्य आजारावर जागर करणार
वर्धेत ‘नो व्हेईकल डे’बाबत जनजागृतीचा निर्धार वैद्यकीय जनजागृती मंच व आम्ही वर्धेकरने घेतला आहे. शहरातील ३९ वॉर्डांमध्ये दर गुरुवारी जनजागर रॅली काढली जाणार असून नागरिकांशी थेट संवाद साधत प्रदूषणजन्य आजार व त्यावर प्रतिबंध पटवून देणार आहे. ही मोहीम प्रत्येक गुरुवारी सकाळी ७ वाजता असणार, अशी माहिती मंचचे सचिव डॉ. यशवंत हिवंज यांनी दिली. दि. ७ ला वॉर्ड क्र. ७ मध्ये ही रॅली जाणार. रॅलीला ७७ वर्षीय वर्ल्ड जिम येथे झमनलाल प्रीतमलाल भट हिरवी झेंडी दाखवतील. रॅली आयोजन समितीत उपक्रम प्रमुख डॉ. सचिन पावडे असतील. वर्धेतील जागृत नागरिकांनी सर्वांच्या हितावह मोहिमेत सहभागी होऊन गुरुवार हा प्रदूषणमुक्त वाहन विरहीत दिवस पाळण्याचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन डॉ. सचिन पावडे व संजय इंगळे तिगावकर यांनी केले आहे.

Web Title: Wager, 'Door to Door' Jagar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.