शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर पोलिसांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक; तीन कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 16:36 IST

अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला परत घेऊन येत असताना अज्ञात वाहनाने पोलिसांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

ठळक मुद्देसुदैवाने जीवितहानी टळली

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ही घटना आज(दि. १७) पहाटे ५ च्या सुमारास घडली. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे. 

हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी (पोहणा) येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने प्रवाशी घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्सने बंद अवस्थेत उभ्या असलेल्या टिप्परवर मागून जबर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती वडनेर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ आपल्या वाहनाने अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला परत घेऊन येत असताना अज्ञात वाहनाने पोलिसांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली.

या अपघात पोलीस वाहनचालक गणेश मेश्राम, पंढरी शेळके, खोडे जखमी झाले असून त्यांना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पोलिसांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संबंधी वडनेर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसHinganghatहिंगणघाट