जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियानाला सुरूवात
By Admin | Updated: June 19, 2014 00:13 IST2014-06-19T00:13:34+5:302014-06-19T00:13:34+5:30
मतदार यादीत नाव नोंदविण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली असून, मतदार यादीत नाव नसलेल्या तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना

जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियानाला सुरूवात
वर्धा : मतदार यादीत नाव नोंदविण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली असून, मतदार यादीत नाव नसलेल्या तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम सुरु असून, जवळच्या मतदान सहायता केंद्रात मतदान नोंदणीचे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
यात छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून, मतदारांनी या विशेष मोहिमेमध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार मदत केंद्रावर सादर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांंनी नागरिकांना केले आहे. मतदार यादीतून आपले वगळले गेले असल्यास अथवा नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमूना क्रमांक ६ मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मतदार यादीतील नाव नोंदणी संदर्भात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी नमुना क्रमांक ७ तसेच मतदार यादीतील तपशिलामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास अथवा विधानसभा मतदार संघाअंतर्गत पत्ता बदलायचा असल्यास नमुना ८ अ भरणे आवश्यक आहे. मतदार यादीतून आपले नाव वगळले गेले असल्यास किंवा मतदार यादी पाहण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयात मतदार यादी उपलब्ध आहे. नवीन मतदार नोंदणीसाठीचे विहित नमून्यातील अर्ज मतदार मदत केंद्रावर उपलब्ध असून, याच केद्रावर अर्ज स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. छायाचित्र मतदार ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. १ जानेवारी २०१४ रोजी १८ वर्षे पुर्ण केलेल्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यचे आवाहन केले आहे.(शहर प्रतिनिधी)