विठ्ठल-रुख्माई मंदिराचा वाद चव्हाट्यावर
By Admin | Updated: May 19, 2016 01:43 IST2016-05-19T01:43:20+5:302016-05-19T01:43:20+5:30
स्थानिक विठ्ठल-रुख्माई देवस्थानच्या विश्वस्थ मंडळातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

विठ्ठल-रुख्माई मंदिराचा वाद चव्हाट्यावर
जाहीर सभेत केजाजी महाराजांचे वंशज भांदककर यांनी केले आरोप
घोराड : स्थानिक विठ्ठल-रुख्माई देवस्थानच्या विश्वस्थ मंडळातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विश्वस्थ मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरूद्ध संत केजाजी महाराज यांचे वशंज विठ्ठल महाराज भांदककर यांनी जाहीर सभा घेऊन थेट आरोप केले. यामुळे ग्रामस्थांतही असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी सायंकाळी विठ्ठल-रुख्माई देवस्थानसमोर ही जाहीर सभा घेण्यात आली. देवस्थान कमेटीचे कोषाध्यक्ष उपस्थित होते. काही वर्षांपासून विश्वस्थ मंडळाविरूद्ध ग्रामस्थांत असलेला असंतोष ग्रा.पं. च्या ग्रामसभेतही दिसून आला होता. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा ठरावही पारित झाला होता. भांदककर यांनी रामनवमीला पहिली सभा घेतली. यानंतर दुसऱ्यांदा सभा घेत ग्रामस्थ व भाविकांना सजग करण्याचा प्रयत्न केला. विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष हे नाममात्र असून कोषाध्यक्षालाही झालेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती नाही. सहसचिवाला देवस्थान कमिटीजवळ किती रुपये शिल्लक आहे, हे माहिती नाही. मग, हा व्यवहार करतो कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा सर्व व्यवहार एकटा विश्वस्थ पाहत असल्याचा थेट आरोप करण्यात आला.