पंतप्रधानांच्या प्रतिमेला कांदे व डाळीची भेट
By Admin | Updated: August 30, 2015 01:58 IST2015-08-30T01:58:25+5:302015-08-30T01:58:25+5:30
वाढती महागाई लक्षात घेता वर्षभराचा कालावधी लोटूनही केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधानांच्या प्रतिमेला कांदे व डाळीची भेट
वर्धा : वाढती महागाई लक्षात घेता वर्षभराचा कालावधी लोटूनही केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. स्थानिक सद्भावना भवनाच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांदा व डाळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप महागाई कमी झालेली नाही. उलट कांदे व डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल आहेत. आजस्थितीत सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे रोजगारीचा प्रश्नसुद्धा वाढीस लागला आहे. कांदा व डाळींचे भाव वाढले असले तरी त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच त्यांच्याकडील मालाची विक्री केली आहे. या सर्व परिस्थितीत गरीब जनता व शेतकरी भरडल्या जात आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.
यवेळी लोकसभा उपाध्यक्ष संदीप सुटे, माजी अध्यक्ष महेश तेलरांधे, देवळी विधानसभा अध्यक्ष विपीन राऊत, महासचिव सुधीर वसू यांच्या उपस्थितीत सदर नैवेद्य दाखविण्यात आला.(शहर प्रतिनिधी)