दारूचा गुन्हा रद्द करण्यासाठी विरूगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:22 IST2018-01-09T22:21:49+5:302018-01-09T22:22:11+5:30
दारू बाळगल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरिता येथील किसना खोडे नामक व्यक्तीने मंगळवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.

दारूचा गुन्हा रद्द करण्यासाठी विरूगिरी
आॅनलाईन लोकमत
विजयगोपाल : दारू बाळगल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरिता येथील किसना खोडे नामक व्यक्तीने मंगळवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले. यावेळी त्याने सोबत रॉकेलच्या डबक्या नेल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गुन्हा दाखल नसताना झालेल्या आंदोलन झाल्याने पोलिसही विचारात पडले.
येथील किसना खोडे (६५) यांची चार जानेवारीला पिण्यासाठी आणलेली दारू पोलिसांनी पकडली होती. त्यामुळे बोंडे यांना पुलगाव पोलीस ठाण्यात बोलावले होते. यामुळे खोडेला आपल्यावर दारूचा गुन्हा दाखल होईल आणि आपल्याला कारागृहात जावे लागले, असे वाटल्याने त्याने गुन्हा दाखल करण्याकरिता हे आंदोलन केले. खोडे विजयगोपाल येथील पाण्याच्या टाकीवरती दोर व रॉकेल घेऊन चढला. तेथून जोपर्यंत केस खारीज करणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. याकडे दुर्लक्ष केल्यास गळफास घेण्याचा इशारा दिला. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मुरलीधर बुराडे घटनास्थळी दाखल झाले. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले.
खोडे यांनी जोपर्यंत सरपंच निलम संजय बिन्नोड येत नाही व गुन्हा दाखल होणार नाही असे लेखी देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे सांगितले. अखेर सरपंच बिन्नोड यांनी लेखी दिल्यानंतर ते खाली उतरले. वास्तविकतेत खोडे वयोवृद्ध असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल केला नव्हता. ते खाली उतरल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.