शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

नियमांचे उल्लंघन; 77 लाख 67 हजारांचा दंड केला वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पण, अनेक व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानल्याने कोविड विषाणूच्या संसर्गाला खतपाणी मिळाले. कोविड नियंत्रण पथकांनी आतापर्यंत तब्बल ९१ हजार ३१४ व्यक्तींवर धडक कारवाई करून त्यांच्याकडून ६९ लाख ४१ हजार ३२४ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देगाफील राहिल्यास जिल्ह्यावर ओढवणार कोविडची तिसरी लाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्तीने वाहतूक तसेच जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सर्वच स्तरांतून करण्यात आले. परंतु, अनेक व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यावर कोविडची दुसरी लाट ओढवली. जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरली असली, तरी याच कोविड संकटाच्या काळात बेशिस्तांकडून तब्बल ७७.५७ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वास्तव आहे.कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पण, अनेक व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानल्याने कोविड विषाणूच्या संसर्गाला खतपाणी मिळाले. कोविड नियंत्रण पथकांनी आतापर्यंत तब्बल ९१ हजार ३१४ व्यक्तींवर धडक कारवाई करून त्यांच्याकडून ६९ लाख ४१ हजार ३२४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, याच कोविड संकटाच्या काळात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्यांकडून पोलीस विभागाने ८ लाख १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली, तरी प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.दंडवसुलीत वर्धा उपविभाग अव्वलn वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट असे महसूलचे तीन उपविभाग जिल्ह्यात आहेत. कोविडची पहिली तसेच दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना या तिन्ही उपविभागांत कोविड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न झाले. असे असले तरी   वर्धा उपविभागाने सर्वाधिक दंडवसुली केल्याचे सांगण्यात आले.

फॅन्सी नंबरप्लेटची क्रेझ कायमचफॅन्सी नंबरप्लेट वाहनाला बसवणे कायद्यान्वये गुन्हा आहे. अशी नंबरप्लेट वाहनाला बसवणाऱ्यांवर वाहतूक नियमान्वये कारवाई केली जाते. मागील पाच महिन्यांत फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या २२५ वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १२५ वाहनचालकांकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूणच, कोरोनाकाळातही फॅन्सी नंबरप्लेटची क्रेझ कायम असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.विनासीटबेल्ट वाहन चालवण्यात मानली जातेय धन्यता१ जानेवारी ते मे अखेरपर्यंत तब्बल २ हजार ६६८ व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी एक हजार ९८६ व्यक्तींकडून ३ लाख ९७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने सीटबेल्ट बांधणे क्रमप्राप्त आहे. परंतु, अनेक व्यक्ती विनासीटबेल्ट वाहन चालवण्यात धन्यता मानत असल्याचे या पाच महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस