गावांची ओळख झाली कठीण
By Admin | Updated: February 20, 2015 01:36 IST2015-02-20T01:36:06+5:302015-02-20T01:36:06+5:30
गावाची ओळख व्हावी याकरिता गावाजवळ त्याच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. ही फलके प्रारंभीच्या काळात सर्वांच्या नजरेत पडत असले तरी त्यांची ओळख पुसली आहे.

गावांची ओळख झाली कठीण
वर्धा : गावाची ओळख व्हावी याकरिता गावाजवळ त्याच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. ही फलके प्रारंभीच्या काळात सर्वांच्या नजरेत पडत असले तरी त्यांची ओळख पुसली आहे. यामुळे वायगाव (निपाणी) ते राळेगाव मार्गावरील गाव ओळखणे कठीण होत आहे.
रस्त्यांची कामे करताना गावा जवळ पुढे गाव आहे, अथवा गावाच्या नावाचे फलक लावण्यात आली होती. सोबतच वळण रस्त्यांवरही गावाला जाणाऱ्या रस्त्यांची माहिती देणारी फलके लावण्यात आली होती. या फलकांवरून गाव असल्याची व कोणते गाव कोणत्या मार्गावर आहे याची माहिती मिळत होती. मात्र गत काही दिवसांपासून या फलकांवरील नावे मिटल्याचे दिसून येत आहे. शिवाय काही गावाच्या फलकांवर बियाणे कंपनीची जाहिरात पत्रके लावण्यात आली आहे. यामुळे गावाची नावेही बदलली आहेत. याचा त्रास रस्त्याने जाणाऱ्या नवख्या प्रवाशांना होत आहे. त्यांना हा मार्ग कोणत्या गावाला जातो, हे सांगण्याकरिता कोणी रस्त्यावर राहत नसल्याने अनेकांना रस्ता चुकल्याचे समोर आले आहे.
शासनाने रस्ते विकास करताना या रस्त्याच्या कडेला फलक लावले होते. याचा उद्देश मात्र आज हरविल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. काही ठिकाणी ही फलके रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपात हरविली आहे. ती पाहण्याकरिता रस्त्याच्या कडेला शोध घेण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना माहिती देण्याकरिता आवश्यक असलेली ही फलके वाटसरूंना माहिती देण्याकरिता कुचकाही ठरत आहे.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व रस्ते विकास महामंळाने ही फलके शोधून त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शिवाय काही ठिकाणची फलके तुटलीही आहेत. गावाची ओळख देणाऱ्या व गावाच्या किलोमिटरची ओळख देणाऱ्या या फलकांवर मिटलेली गावाची नावे दुरूस्त करून त्यावचर जाहिरातींची पत्रके चिपकविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)