ग्रामसचिवांच्या आंदोलनामुळे ग्रामस्थ त्रस्त

By Admin | Updated: July 7, 2014 00:03 IST2014-07-07T00:03:50+5:302014-07-07T00:03:50+5:30

शाळा प्रवेशाचे दिवस सुरू असताना ग्रामसचिवाने सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामस्थ व विद्यार्थी अडचणीत सापडले आहे.

The villagers suffer due to the agitation of the villagers | ग्रामसचिवांच्या आंदोलनामुळे ग्रामस्थ त्रस्त

ग्रामसचिवांच्या आंदोलनामुळे ग्रामस्थ त्रस्त

घोराड : शाळा प्रवेशाचे दिवस सुरू असताना ग्रामसचिवाने सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामस्थ व विद्यार्थी अडचणीत सापडले आहे.
विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची गरज आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला, बी.पी.एल. प्रमाणपत्रासाठी गावागावातील ग्रामपंचायत मध्ये येरझारा मारताना दिसत आहे.
सेलू तालुक्यात ६३ ग्रामपंचायत असून ११० गावाचा समावेश आहे. यापैकी ५७ ग्रामपंचायतचे ग्रामसचिव या आंदोलनात सहभागी झाले आहे. यांनी ग्रामपंचायतच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या. सहा ग्रामपंचायतचे कामकाज चार कंत्राटी ग्रामसेवकाकडे असल्याने ते सुरू आहे.
या आंदोलनामुळे नरेगा, शौचालय बांधकाम, शतकोटी वृक्ष लागवडीवर परिणाम होताना दिसत आहे. ग्रामसचिव व शासन यांच्यातील ही समस्या असली तरी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी मात्र अडचणीत सापडले आहे. अनेक कागदपत्रामभावी त्यांची कामे होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे.
आंदोलनात मनोज माहुरे, रमेश शहारे, दिगांबर शेटे, गणेश उमाटे, ईश्वर मेसरे, गुंडवार, पुसनायके, कोटंबकर, डमाळे, खराबे, चव्हाण, चौधरी आदी ग्रामसचिवाचा समावेश आहे. ग्रामसचिवाचे आंदोलन कधी संपणार याची ग्रामस्थात प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: The villagers suffer due to the agitation of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.