कृषी विभाग देणार शेतकर्यांना गावोगावी संदेश
By Admin | Updated: May 20, 2014 23:49 IST2014-05-20T23:49:34+5:302014-05-20T23:49:34+5:30
राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्यांना गावोगावी संदेश

कृषी विभाग देणार शेतकर्यांना गावोगावी संदेश
सुरेंद्र डाफ - आर्वी
राज्यातील खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम नैसर्गिक प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडले़ यामुळे शेतकर्यांना नुकसान सोसावे लागले़ येत्या हंगामात तसे होऊ नये म्हणून शेतकर्यांना गावोगावी संदेश पोहोचविले जाणार आहेत़ यासाठी कृषी विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे़ यात सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकर्यांना माहिती दिली जाणार आहे़ खरीप हंगामात विदर्भातील सोयाबीन हे पीक सध्या महत्त्वाचे मानले जात आहे़ शेतकर्यांना शुद्ध व उत्पादीत सोयाबीन बियाणे मिळावे यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत़ बोगस बियाण्यांना व नियंत्रण ठेवण्यासाठी पथके निर्माण केली आहेत़ शेतकर्यांना आपल्याच शेतातील सोयाबीनची उगवणशक्ती तपासून पेरणी करण्यासाठी ग्रामीण भागातील गावोगावी संदेश कृषी विभागाद्वारे देण्यात येणार आहे़ राज्यातील शेतकर्यांचे खरीप व रब्बी, हे दोन्ही हंगाम व्यर्थ ठरले़ अतिवृष्टी व पावसाच्या फटक्याने तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब आले़ अनेकांचे सोयाबीनचे पीक पाण्याने खराब झाले़ यामुळे नुकसान सोसावे लागले़ अनेकांना झालेला खर्चही भरून काढता आला नाही़ प्रारंभी सोयाबीनला ३०० ते ३०६० पर्यंत भाव मिळाले़ मार्च अखेरपर्यंत ही भाववाढ न झाल्याने शेतकर्यांनी शेतातील सोयाबीन बाजारपेठेत विकले़ राज्यात सर्वत्र सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीने झोडपले असताना निकोप, उत्कृष्ट व उपजावू शक्ती असलेले सोयाबीन बियाणे मिळणार काय, हा प्रश्नच आहे़ शेतकर्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पेरणीसाठी राखूव ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाद्वारे केले जात आहे; पण शेतकर्यांकडे पेरणीयोग्य सोयाबीन नसल्याने तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सोयाबीन बियाण्यांच्या भासणार्या तुटवड्याबाबत कृषी विभागाने बैठकी घेऊन खासगी व शासकीय कंपन्यांची बैठक घेतली़ यात सोयाबीन पिकाच्या बियाण्यांवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाधिक शेतकर्यांना निकोप व उत्पादन देणारे तसेच उगवण शक्ती असलेले बियाणे देण्याबाबत उपाययोजना करणे सुरू आहे़ राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा बघता काही बोगस बियाण्यांची विक्री कृषी केंद्रामार्फत केले जाण्याची शक्यता आहे़ यामुळे उपाययोजना म्हणून ज्या शेतकर्यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवले, त्यांनी त्या बियाण्यांची उगवण शक्ती तपासून लागवड करावी, असे संदेश दिले जाणार आहेत़ यासाठी गुणनियंत्रण पथक, तालुका जि़प़, पं़स स्तरावर नेमण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे़