लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : कुठल्याही रासायनिक कीटक नशकाने बोंड अळी वर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे निदर्शनास आल्याने शेतकरी आता गावठी उपचाराकडे वळल्याचे दिसून येत आहे.तंबाखू, लसूण, कडूनिंबाचा पाला, हिरवी मिरची यांचे द्रावण तयार करून ते पिकावर फवारल्यास बोंडअळी वर नियंत्रण मिळविता येत असल्याचे शेतकरी सांगतात. दोन किलो पत्तीचा तंबाखू, एक किलो हिरवी मिरची, एक किलो लसूण तीन किलो कडूनिंबाचे पान घेऊन त्यात १० लिटर पाणी टाकून उकळविले जाते. पाणी पाच लिटर असेपर्यंत उकळवून वस्त्रगाळ करून द्रावण तयार केले जाते.प्रती १५ लिटर ला १०० मीली ग्राम द्रावण घेऊन ८ दिवसच्या अंतराने फवारणी केल्यास बोंडआळीवर नियंत्रण मिळविता येत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कमी खर्चाचे हे औषध बनविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. यासोबतच दशपर्णी अर्क देखील शेतकºयांकडून फवारले जात आहे.
बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांचा गावठी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST