विजयाची ओव्हर हॅट्ट्रिक
By Admin | Updated: October 19, 2014 23:59 IST2014-10-19T23:59:23+5:302014-10-19T23:59:23+5:30
देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघावर काँगे्रसचा वरचष्मा होता़ स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये एक-दोन अपवाद वगळता काँगे्रसच्या उमेदवारानेच येथे बाजी मारली आहे़ १९९९ पासूनही काँगे्रसच्या

विजयाची ओव्हर हॅट्ट्रिक
देवळी मतदार संघ : चौथ्यांदा विजयाचा जल्लोष
वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघावर काँगे्रसचा वरचष्मा होता़ स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये एक-दोन अपवाद वगळता काँगे्रसच्या उमेदवारानेच येथे बाजी मारली आहे़ १९९९ पासूनही काँगे्रसच्या रणजीत कांबळे यांनी एकतर्फी सत्ता गाजविली आहे़ गत विधानसभा निवडणुकीत काँगे्रसला ३ हजारांवर अल्प मतांनी विजय मिळविता आला होता़ यंदाच्या निवडणुकीत त्यापेक्षाही कमी मतांनी कांबळे यांना विजय मिळविता आला आहे़ असे असले तरी चौथ्यांदा विजय प्राप्त करण्याची किमया काँगे्रसचे कार्यकर्ते व आ़ रणजीत कांबळे यांना साधता आली आहे़
स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये दिवंगत प्रभा राव यांनी अनेक वर्षे काँगे्रसचा गड राखला़ यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत रणजीत कांबळे यांचे पदार्पण झाले़ त्यांनीही राव यांच्या पावलावर पाऊल टाकत विजयाचे गणित जुळवून आणले़ पुन्हा २००५ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते़
यानंतर २००९ मध्ये कांबळे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली़ यावेळी पुन्हा सार्वजनिक पाणी पुरवठा, स्वच्छता व बांधकाम राज्यमंत्रीपद देण्यात आले़ यंदाची निवडणूक मात्र त्यांच्याकरिता अटीतटीची ठरली़ सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात असल्याने काँगे्रसला विजय प्राप्त करणे कठिण होईल, अशी मते व्यक्त होत होती़ मतमोजणी सुरू असताना काहीशी ती खरी ठरत असल्याचेही वाटत होते; पण मतमोजणी अंतिम टप्प्यात येत असताना काँगे्रसच्या बाजूने कौल झुकताना दिसून आला़
अखेर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत भाजपच्या सुरेश वाघमारे यांना पराभूत करून रणजीत कांबळे यांना केवळ ९४३ मतांनी विजय प्राप्त करता आला़ काँगे्रसचे रणजीत कांबळे यांना ६२ हजार ५३३ मते तर भाजपचे सुरेश वाघमारे यांना ६१ हजार ५९० मते प्राप्त झालीत़(कार्यालय प्रतिनिधी)