विदर्भवादी संघटनांकडून महाराष्ट्र दिनी निषेध

By Admin | Updated: May 2, 2016 02:06 IST2016-05-02T02:06:03+5:302016-05-02T02:06:03+5:30

येथील विदर्भवादी संघटनांकडून रविवारी महाराष्ट्र दिन हा काळा दिन म्हणून पाळण्यात आला. काळ्या फिती लावून यावेळी

Vidarbhaist organizations protest on Maharashtra Day | विदर्भवादी संघटनांकडून महाराष्ट्र दिनी निषेध

विदर्भवादी संघटनांकडून महाराष्ट्र दिनी निषेध

वर्धा :येथील विदर्भवादी संघटनांकडून रविवारी महाराष्ट्र दिन हा काळा दिन म्हणून पाळण्यात आला. काळ्या फिती लावून यावेळी शासनाविरोधी घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. सकाळी १० वाजताच्या शिवाजी चौक येथून मोर्चा काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अभिवादन करून विदर्भाचा झेंडा फडकावित मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्याची होळी करण्यात आली.
महाराष्ट्र दिनी विदर्भवादी संघटनांकडून विदर्भाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ठरलेल्या कार्यक्रमानुसार सकाळी सर्वच संघटनांचे पदाधिकारी शिवाजी चौक परिसरत एकत्र आले. येथे उपस्थित सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या बळकटी देण्यासंदर्भात आपली भूमिका विषद केली. यानंतर मोर्चा काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी चौकात जाळला जाहिरनामा
४निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने त्यांच्या जाहिरनाम्यात वेगळा विदर्भ देण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र आता वास्तवात तसे होताना दिसत नाही. यामुळे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत विदर्भवादी संघटनांच्यावतीने आंदोलनाची भूमिका विषद करताना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भाजपाचा निवडणूक जाहीरनामा जाळला. यावेळी शहर पोलिसांनी आंदोलकांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेत शहर ठाण्यात आणले. येथे सुमारे तासभर त्यांना स्थानबद्ध करून सोडण्यात आले.
सेलूतही निदर्शने
४सेलू येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या ध्वजारोेहणाच्यावेळी नगरसेवक शैलेंद्र दप्तरी, रामनारायण पाठक, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार आणि विदर्भ राज्याच्या समर्थकांनी विदर्भ राज्याकरिता घोषणा देत महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदविला.

Web Title: Vidarbhaist organizations protest on Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.