खड्ड्याने घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2015 01:57 IST2015-07-18T01:57:46+5:302015-07-18T01:57:46+5:30

वर्धा-नागपूर मार्गावरील महाबळा जवळ खोल खड्डे पडले आहे. या खड्ड्यात वाहन अडखळल्याने झालेल्या नुकत्याच अपघाताच्या नवविवाहितेचा बळी गेला.

The victim is the victim of the woman | खड्ड्याने घेतला महिलेचा बळी

खड्ड्याने घेतला महिलेचा बळी

ग्रामस्थ संतप्त : डागडुजी करण्याची मागणी
सेलू : वर्धा-नागपूर मार्गावरील महाबळा जवळ खोल खड्डे पडले आहे. या खड्ड्यात वाहन अडखळल्याने झालेल्या नुकत्याच अपघाताच्या नवविवाहितेचा बळी गेला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तसेच या भागातील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे अशी मागणी केली आहे.
या वर्दळीच्या महामार्गावर सेलू ते महाबळा पर्यंत ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहे. या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे येते. हे खड्डे जीवघेणे ठरत आहे. यातच १२ जुलैला पतीसह दुचाकीने जाताना नवविवाहितेला अपघात झाला. यात मनीषा प्रशांत क्षीरसागर हिचा नाहक बळी गेला. यामुळे संतप्त झालेल्या सेलू, महाबळा येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला खड्डे बुजविण्याचे साकडे घातले. येथे गतिरोधक लावण्याची मागणी यावेळी केली. याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला. खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The victim is the victim of the woman