जिल्ह्यातच होणार जात प्रमाणपत्राची पडताळणी

By Admin | Updated: November 19, 2016 01:01 IST2016-11-19T01:01:14+5:302016-11-19T01:01:14+5:30

जात प्रमाणपत्राची पडताळणी ही विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १

Verification of the certificate to be done in the district | जिल्ह्यातच होणार जात प्रमाणपत्राची पडताळणी

जिल्ह्यातच होणार जात प्रमाणपत्राची पडताळणी

सामाजिक न्याय भवनात कार्यालय
वर्धा : जात प्रमाणपत्राची पडताळणी ही विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ नागपूर येथून केली जात होती. ११ नोव्हेंबर २०१६ च्या शासन आदेशानुसार आता जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सोमवार (दि.२१ नोव्हेंबर)पासून जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सामाजिक न्याय भवन येथे सुरू होत आहे.
जिल्ह्यातील शैक्षणिक, सेवाविषयक व निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी नागरिकांनी सोमवारपासून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अर्ज सादर करावे. तसेच यापूर्वी नागपूर विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केल्यास अर्जात काही आक्षेप असल्यास अर्जदारांनी नव्याने सुरू झालेल्या जिल्हास्तरीय कार्यालयात आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी किंवा पुढील कार्यवाही संदर्भात संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. मात्र निवडणूक विषयक अर्जदाराचे अर्ज नागपूर येथील कार्यालयात २१ नोव्हेंबर पर्यंत स्वीकारण्यात येतील, असे समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Verification of the certificate to be done in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.