शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 11:59 IST

हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणावचा निकाल आज देण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी विकेश नगराळे याला न्यायालय काय शिक्षा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देतालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त

वर्धा : संपूर्ण राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या हिंगणघाट येथील प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांडाचा आज (दि. ९) निर्णय देण्यात येणार आहे. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला १० फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 

३ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ७ च्या सुमारास नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जात असलेल्या प्रा. अंकिता पिसुड्डेवर आरोपी आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल ओतून जाळले होते. गंभीररित्या जळालेल्या अंकिताला उपचारार्थ नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १० फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजले. दोन वर्षे या खटल्याची सुनावणी चालली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.

या प्रकरणाची पहिली सुणावणी ४ मार्च २०२० ला हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यानंतर आतापर्यंत हिंगणघाट न्यायालयात ६४ सुनावणी घेण्यात आल्या आहेत. यातील ६४ तारखांपैकी ३४ तारखेवर  अॅड. उज्वल निकम सरकारी पक्षातर्फे हजर होते. या प्रकरणात पोलिसांकडे एकूण ७७ साक्षदार होते त्यापैकी २९ साक्षदारांची साक्ष न्यायलयात नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर, कोरोनाची पहिली लाट आल्याने कामकाज थांबल्यामुळे सुनावणी तब्बल ९ महिने लांबली. आज पीडितेच्या मृत्यू तारखेच्या एक दिवस अगोदर हा निकाल लागणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. निकालानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर, तालुक्यातही काल रात्रीपासून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस