वाहनाला अपघात; १७ किरकोळ जखमी

By Admin | Updated: November 12, 2014 22:48 IST2014-11-12T22:48:51+5:302014-11-12T22:48:51+5:30

पुलगाव मार्गावरील वळण मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू गाडी उलटली. या अपघातात गाडीत असलेल्या २० पैकी १७ जण किरकोळ जखमी झाले.

Vehicle accidents; 17 minor injuries | वाहनाला अपघात; १७ किरकोळ जखमी

वाहनाला अपघात; १७ किरकोळ जखमी

विजयगोपाल : पुलगाव मार्गावरील वळण मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू गाडी उलटली. या अपघातात गाडीत असलेल्या २० पैकी १७ जण किरकोळ जखमी झाले. त्यांना विजयगोपालच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली.
रसुलाबाद येथील डबले परिवारामधील सदस्याचा २ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करून राख घेवून कोटेश्वर येथे परिवारातील सदस्य मालवाहू बोलेरो गाडीने निघाले होते. विजयगोपाल येथील वळण रस्त्यावर त्यांची गाडी उलटली. यात १७ जणांना ईजा झाली असून सहा जणांना सावंगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ जखमीमध्ये बेबी विठ्ठल खोडे, अंजना सावरकर, नारायण डबले, कोमल पडोळे, एकनाथ सावरकर, नामदेव सावरकर, अशोक डबले, भीमराव सावरकर, जानबा सावरकर, रामभाऊ सावरकर, साहेब डबले, महादेव डबले, वर्षा कुरझडकर, बाळीयन कुरझडकर, मोरेश्वर कापसे (हिवरा) या जखमीमध्ये तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे. अपघातानंतर गावकऱ्यांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने विजयगोपाल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. काहिंना सावंगी व वर्धा येथे पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Vehicle accidents; 17 minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.