SSC Result 2020; वेदांत तळवेकर वर्धा जिल्ह्यात टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:10 IST2020-07-29T17:09:58+5:302020-07-29T17:10:39+5:30
वर्ध्यातील सुशिल हिंमतसिंगका विद्यालयाचा वेदांत मुरलीधर तळवेकर याने ९९.४० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.

SSC Result 2020; वेदांत तळवेकर वर्धा जिल्ह्यात टॉप
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोना काळात परिक्षेसह निकालाबाबतही धाकधूक असताना अखेर आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून वर्ध्यातील सुशिल हिंमतसिंगका विद्यालयाचा वेदांत मुरलीधर तळवेकर याने ९९.४० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्याचा सरासरी निकाल ९३.८४ टक्के लागला असून यामध्ये सर्वात कमी निकाल वर्धा जिल्ह्याचा लागला आहे. यावर्षी वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील २८९ शाळांमधून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विशेष गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल तब्बल २५.१० टक्क्यांनी वाढला आहे.