शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेची महावितरणच्या कार्यालयावर धडक, भारनियमनासह रेटल्या शेतक-यांच्या विविध मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:12 IST

वर्धा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

वर्धा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारनियमनाच्या वेळापत्रकात तात्काळ बदल करण्यात यावा यासह शेतक-यांच्या विविध मागण्या महावितरणच्या अधिका-यांकडे रेटून लावल्या होत्या.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेल्या मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) भागातील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना महावितरणच्या कार्यालयाच्या मुख्य द्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनाची माहिती महावितरणच्या अधिका-यांना देण्यात आली. महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे यावेळी कार्यालयात गैरहजर असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी महावितरणचे सदावर्ते व उरकुडे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागांत महावितरणच्या वतीने सध्या सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे किंवा शेतक-यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सोईचे होईल, अशा पद्धतीने भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, जिल्ह्यातील सर्वच कृषीपंपांना दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, थकबाकी असल्याचे कारण पुढे करून कृषीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असून, हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, अनेक शेतक-यांना सरासरी काढून विद्युत देयके दिली जात आहेत. महावितरणाच्या कर्मचा-यांकडून प्रत्येक कृषी मीटरचे रीडिंग घेत शेतक-यांना योग्य देयके देण्यात यावी आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या. आंदोलनात मधुसुदन हरणे, शैला देशपांडे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, उल्हास कोटंबकर, सचिन डाफ, अरविंद बोरकर, राऊत, शांताराम भालेराव, प्रकाश जिकार, खुशाल हिवरकर, प्रमोद तलमले, मंगेश मानकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात केल्या घोषणामोर्चा बोरगाव (मेघे) परिसरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय येथे येताच पोलिसांनी तो मुख्य प्रवेशद्वारावर अडविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

टॅग्स :Farmerशेतकरी