सालोड शिवारात शिवशाही उलटली; पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:55 AM2019-10-26T11:55:39+5:302019-10-26T11:55:47+5:30

यवतमाळ येथून वर्धेच्या दिशेने येत असलेली (एमएच-२९ बी. इ-१२५९) क्रमांकाची शिवशाही बस अनियंत्रित होत उलटली.

vardha accident, Five were injured | सालोड शिवारात शिवशाही उलटली; पाच जखमी

सालोड शिवारात शिवशाही उलटली; पाच जखमी

Next

वर्धा : यवतमाळ येथून वर्धेच्या दिशेने येत असलेली (एमएच-२९ बी. इ-१२५९) क्रमांकाची शिवशाही बस अनियंत्रित होत उलटली. ही घटना शनिवारी सकाळी 11च्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गावरील सालोड (हिरपूर) शिवारात घडली. या अपघातात चालकासह एकूण पाच जण जखमी झाले. अपघातग्रस्त बसवर जिवंत विद्युत तारा होत्या. त्यामुळे बसमध्येही विद्युत प्रवाहित झाला होती. परिसरातील नागरिकांनी जखमींना वेळीच बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याअपघातात एक महिला गंभीर जखमी आहे.

Web Title: vardha accident, Five were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.