शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST

वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी लसीकरण मोहीम सुरू होती; परंतु दुपारी १२ वाजताच्या सुमारास लस संपल्याने अनेक लाभार्थ्यांना परत जावे लागले,  तर शनिवारी रेल्वे रुग्णालय, तारफैल येथील नागरी रुग्णालय, पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय, नंदोरी येथील लसीकरण केंद्र, रोहणा येथील लसीकरण केंद्र ही लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती.

ठळक मुद्देशनिवारी सात व्हॅक्सिनेशन सेंटर राहिले बंद : शुक्रवारी सायंकाळी शिल्लक होते लसीचे केवळ साडेनऊ हजार डोजेस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड व्हॅक्सिनच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोविडची लस घेण्यासाठी लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी केल्याने सायंकाळी उशिरा वर्धा जिल्ह्यात अचानक लस तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील तब्बल सात लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली. विशेष म्हणजे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट पाच जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा समावेश असून, लस तुटवड्यामुळे सध्या लसीकरणालाच ब्रेक लागला आहे.वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी लसीकरण मोहीम सुरू होती; परंतु दुपारी १२ वाजताच्या सुमारास लस संपल्याने अनेक लाभार्थ्यांना परत जावे लागले,  तर शनिवारी रेल्वे रुग्णालय, तारफैल येथील नागरी रुग्णालय, पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय, नंदोरी येथील लसीकरण केंद्र, रोहणा येथील लसीकरण केंद्र ही लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती. तसेच वर्धा शहरातील सिव्हिल लाईन येथील पोलीस रुग्णालय या केंद्रावरून केवळ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोज दिला जात होता. एकूणच शनिवारी लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेला चांगलाच ब्रेक लागल्याचे बघावयास मिळाले.

कालावधी पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोज घ्यावाकोव्हॅक्सिनचा पहिला डोज घेऊन २८ दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनी वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील पोलीस रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोज घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी केले आहे.  

शुक्रवारी या ठिकाणी इतके होते व्हॅक्सिन

अल्लीपूर पीएचसी : ४४० (कोव्हिशिल्ड)आंजी पीएचसी : ३८० (कोव्हिशिल्ड)अंतोरा पीएचसी : १४० (कोव्हिशिल्ड)आर्वी एसडीएच : ४६० (कोव्हिशिल्ड)भिडी आरएच :१५० (कोव्हिशिल्ड)बुरकोनी पीएचसी : ३३० (कोव्हिशिल्ड)दहेगाव पीएचसी : ३४० (कोव्हिशिल्ड)गौळ पीएचसी : १४० (कोव्हिशिल्ड)गिरड पीएचसी : ३० (कोव्हिशिल्ड)गिरोली पीएचसी : ७० (कोव्हिशिल्ड)हमदापूर पीएचसी : ३१० (कोव्हिशिल्ड)हिंगणघाट एसडीएच : ०० (कोव्हिशिल्ड)जळगाव पीएचसी : ५३० (कोव्हिशिल्ड)कानगाव : ०० (कोव्हिशिल्ड)कन्नमवारग्राम पीएचसी : ३५० (कोव्हिशिल्ड)कारंजा आरएच : ६३० (कोव्हिशिल्ड)खरांगणा (गो.) पीएचसी : ६१० (कोव्हिशिल्ड)खरांगणा (मो.) पीएचसी : ३४० (कोव्हिशिल्ड)मांडगाव : १२० (कोव्हिशिल्ड)मुदरगाव : ६० (कोव्हिशिल्ड)नाचणगाव : ०० (कोव्हिशिल्ड)नंदोरी पीएचसी : ०० (कोव्हिशिल्ड)पुलगाव आरएच : ३० (कोव्हिशिल्ड)रोहणा पीएचसी : १० (कोव्हिशिल्ड)साहूर पीएचसी : ७६० (कोव्हिशिल्ड)समुद्रपूर आरएच : ६० (कोव्हिशिल्ड)सारवाडी पीएचसी : १९० (कोव्हिशिल्ड)सावंगी (मेघे) एमसी : ३७० (कोव्हिशिल्ड)सेलू : १७० (कोव्हिशिल्ड)सेवाग्राम : ४२० (कोव्हिशिल्ड)सिंदी रेल्वे पीएचसी : ३० (कोव्हिशिल्ड)तळेगाव पीएचसी : ४१० (कोव्हिशिल्ड)विजयगोपाल पीएचसी : ७० (कोव्हिशिल्ड)वडनेर आरएच :६२० (कोव्हिशिल्ड)वायफड पीएचसी : ४०० (कोव्हिशिल्ड)वर्धा डीएच : ३१० (कोव्हिशिल्ड)झडशी पीएचसी : १३० (कोव्हिशिल्ड)वर्धा डीव्हीएस : ०० (कोव्हिशिल्ड)वर्धा डीएच : ३,३०० (कोव्हॅक्सिन)पुलगाव आरएच : ०० (कोव्हॅक्सिन)वर्धा डीव्हीएस : ०० (कोव्हॅक्सिन) 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस