वाहनावर लख्ख प्रकाश दिव्यांचा वापर धोक्याचा
By Admin | Updated: February 17, 2017 02:17 IST2017-02-17T02:17:35+5:302017-02-17T02:17:35+5:30
शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येकजण आपल्या वाहनात नाविण्यपूर्ण बदल करण्याकडे भर देतात.

वाहनावर लख्ख प्रकाश दिव्यांचा वापर धोक्याचा
वर्धा : शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येकजण आपल्या वाहनात नाविण्यपूर्ण बदल करण्याकडे भर देतात. नियमांचे उल्लंघन करून डोळे दिपविणारे पांढरे हेडलाईट वाहनात बसविले जात आहेत. परंतु या प्रकाशामुळे वाहन चालकांना समोरील दिसनासे होते. ही बाब आपघाताचे कारण ठरत आहे.
रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाचे पांढरे हेडलाईट डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे लाईट्स असलेली वाहने शहरात सर्रास धावत असतानाही या वाहनांवर अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. शहरात दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच काही अन्य शहरातील वाहनेसुद्धा शहरात दाखल होतात. यामध्ये काही वाहनांना प्रखर असे पांढरे हेडलाईट असल्याचे निदर्शनास येते. पांढरा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहन चालकांच्या डोळयावर पडत असल्याने वाहन चालकांना काहीच दिसत नसल्याने जागीच थांबावे लागते. अशावेळी अपघातही होतात. या प्रकारच्या घटनांमध्ये नागरिक तक्रार सुद्धा करीत नाही. अपघात होताच वाहन चालक पळून गेल्यकहा घटना घडल्या आहे.
शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटार सायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर कारवाई झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. पांढऱ्या हेडलाईटमुळे पडणाऱ्या तीव प्रकाशाने डोळ्यापुढे अंधारी येते. नेत्रविकार असणाऱ्यांना याचा त्रास होतो. वाहतूक शाखेने याची गांभिर्याने दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)