शहरी भागात ‘अर्बन पीएचसी’
By Admin | Updated: February 21, 2015 01:46 IST2015-02-21T01:46:40+5:302015-02-21T01:46:40+5:30
आरोग्य विभागाच्या पाहणीत अस्तित्त्वात असलेल्या आरोग्य सुविधा शहरातील मागास

शहरी भागात ‘अर्बन पीएचसी’
रूपेश खैरी ल्ल वर्धा
आरोग्य विभागाच्या पाहणीत अस्तित्त्वात असलेल्या आरोग्य सुविधा शहरातील मागास भागात पोहोचत नसल्याचे समोर आले. यामुळे शासनाच्यावतीने अशा मागास भागात आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वेगळे आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. यात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा शहरात प्रत्येकी दोन केंद्र मंजूर करण्यात आहे. हे ‘अर्बन पीएचसी’ नावाने सेवा देणार आहेत.
आरोग्य सुविधेवर शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही त्या कुचकामी ठरत आहेत. या सुविधा शहरातील मागास भागात पोहोचत नसल्याने येथे रोग बळावत आहेत. या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी, त्यांचे आरोग्य सुदृझ व्हावे याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही योजना अंमलात आणली आहे. ५० हजारांच्यावर लोकसंख्या असलेल्या मागास भागात ही केंद्र काम करणार आहे. यात वर्धेतील पुलफैल व सानेवाडी या दोन भागात तर हिंगणघाट येथे इंदिरानगर आणि कबीर वॉर्ड परिसरात हे केंद्र सुरू होणार आहे. वर्धेत सानेवाडी येथील केंद्रात बुधवारी रुग्णांची तपासणी करण्यात आली. अर्बन पीएससी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकार क्षेत्रात राहणार आहेत. या केंद्रातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळते वा इतर आरोग्य केंद्रांप्रमाणे त्या कुचकामी ठरतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
एका आरोग्य केंद्राकरिता १६ कर्मचाऱ्यांची कुमक
४शहरी भागात सुरू होत असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता कर्मचाऱ्यांची संख्या निर्धारीत करण्यात आली आहे. यात दोन वेद्यकीय अधिकारी एक कायमस्वरुपी व एकाची नियुक्ती तात्पूरती राहणर आहे. या व्यतिरिक्त तीन स्टाफ नर्स, एक औषधी निर्माता, चार आर्रोय सेविका, पाच आरोग्य सेवक व एक व्यवस्थापक राहणार आहे. चार केंद्राकरिता असू एकूण ६४ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. वर्धा व हिंगणघाट येथे सुरू करण्यात आलेल्या या केंद्रावर असलेल्या सुविधांचा लाभ त्या भागातील नागरिकांना होणे अपेक्षित आहे.
दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत मिळणार सेवा
४शहरी भागात असलेल्या या आरोग्य केंद्रात दररोज दुपारी १२ वाजता सेवा सुरू होणार आहे. ही सेवा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यात रुग्णांना पुरेपूर सेवा देण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
४वर्धा शहरात सानेवाडी येथे या बुधवारी केेंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी केंद्राला भेट देत आरोग्य तपासणी करून घेतली.
शहरात असलेल्या स्लम भागात आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या केंद्रातून त्या भागात असलेल्या नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. याची वर्धेत सुरूवात झाली आहे.
- निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक, वर्धा.