जुलैअखेर होणार शिधापत्रिकांचे ‘अपडेशन’

By Admin | Updated: May 14, 2015 02:03 IST2015-05-14T02:03:22+5:302015-05-14T02:03:22+5:30

बारकोडेड संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलांची नावे, फोटोसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च रोजी घेतला.

'Updation' of ration cards by the end of July | जुलैअखेर होणार शिधापत्रिकांचे ‘अपडेशन’

जुलैअखेर होणार शिधापत्रिकांचे ‘अपडेशन’

धनराज हुलके वर्धा
बारकोडेड संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलांची नावे, फोटोसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च रोजी घेतला. येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असून पुरवठा विभागाने ३१ जुलै ही ‘डेडलाईन’ ठरविली आहे़
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एनआयसी दिल्लीच्या ‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉप्टवेअर (सीएएस)’ राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दोन टप्प्यामध्ये असणाऱ्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय अन्न महामंडळातून धान्य उचलून त्याचे शासकीय गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे संनियंत्रण तसेच सर्व शिधा वाटप, कार्यालयीन कामाचे संगणकीकरण, शिधापत्रिका देणे आदींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात रास्त भाव दुकानातील व्यवहाराचे संगणकाद्वारे व्यवस्थापण करण्यात येणार आहे.
राज्यात ८० टक्के आधार नोंदणी झाली असल्याने शिधापत्रिका धारकांना संगणकीकृत रेशन कार्ड देण्याकरिता लाभार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक, बॅँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह अन्य माहिती पत्रकाद्वारे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ शिधापत्रिकांची प्रपत्रे शिल्लक असून ते संकलित केले जात आहे़ आधार लिंकची स्थिती पाहता संगणकीकृत शिधापत्रिका व बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वाटपास किमान सहा महिने लागतील असा अंदाज व्यक्त होत आहे़

Web Title: 'Updation' of ration cards by the end of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.