क्रीडाशिक्षक पडवे यांचा अनोखा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:44 IST2018-02-02T23:44:39+5:302018-02-02T23:44:53+5:30
डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक पडवे यांनी अनोखा विक्रम केला आहे. गत ३० वर्षांपासून इंग्रजी, भूगोल विषयाचे अध्यापन करण्यासह ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करतात.

क्रीडाशिक्षक पडवे यांचा अनोखा विक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक पडवे यांनी अनोखा विक्रम केला आहे. गत ३० वर्षांपासून इंग्रजी, भूगोल विषयाचे अध्यापन करण्यासह ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करतात. ध्वजरोहन व ध्वजावतरण याचे त्यांनी ९० वेळा आयोजन केले आहे. या विक्रमाकरिता त्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार केला.
शाळेतील राष्ट्रीय कार्यक्रमात तिरंगाध्वज फडकविण्याची तयारी ते काटेकोरपणे पार पाडतात. यंदा झालेल्या गणराज्य दिनाच्या तयारीची ही त्यांची ९० वी वेळ आहे. एकाच शाळेत झेंडावंदनाच्या तयारीची शतकाकडे वाटचाल करणारे ते एकमेव व्यक्ति असावे.
तिरंग्याची सेवा करीत त्यांनी आपल्या भावनांना शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला. 'कृतज्ञ मी या भारताचा, ज्या भूवर मी जन्म घेतला, जरी असल्या अनेक उणिवा, प्रयत्न करीन दूर सारण्या’ अशा काव्यपंक्तीतून त्यांनी मनोगत व्यक्त केले. कविता स्वातंत्र्याच्या या राज्यस्तरीय कविता संग्रहात पडवे यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. काव्यसंग्रहाचे प्रकाशन सिन्नरम जि. नाशिक येथे करण्यात आले. यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या तिरंग्याच्या अविरत सेवेबद्दल संस्था सचिव अनिल जवादे यांनी प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली.