शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली पुलगाव दारुगोळा स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:40 IST

सोनेगाव आबाजीजवळ पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी  भेट घेतली.

वर्धा -  सोनेगाव आबाजीजवळ पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी  भेट घेतली.  यावेळी खासदार रामदासजी तडस व जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हे उपस्थित होते.अहीर यांनी सर्वप्रथम शालिनी ताई मेघे सुपर स्पेशालिटि हॉस्पिटल येथे कालच्या अपघातातील गंभीर जखमी लोकांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.   या प्रसंगी माझी खासदार दत्ताजी मेघे व रुग्णालयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी गंभीर जखमी रुग्णांच्या उपचारा संदर्भात माहिती दिली, या प्रसंगी श्री हंसराज अहिर म्हणाले पुलगाव सी.ए.डी. कॅम्प हा देशातला महत्वाचा कॅम्प असून या घटनेची केंद्र सरकार कडून कसून चौकशी करून दोषींन वर गंभीर कारवाई केली जाईल व मृतक परिवारांना केंद्र शासन कडून भरीव मदत केली जाईल. यानंतर मा. मंत्री महोदय यांनी सोनेगाव आबाजी या गावात जाऊन मृतकांच्या परिवाराची प्रत्यक्ष भेट घेतली व कॅम्प लगत च्या या गावात बॉम्ब फुटल्या मुळे होत असलेल्या सतत च्या समस्यांची हि चर्चा केलीगुंजखेड जिल्हापरिषद सदस्या सौ वैशाली येरावार व जयंत येरावार यांनी मृत परीवाराणा केंद्र शासन कडून भरीव मदत देण्याची मागणी केली या प्रसंगी गावकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी काल घटना होताच घटना स्थळी जाऊन जखमींना वर उपचार व जिल्हा प्रशासन च्या माध्यमातून जे काम केले त्या करीता गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.या प्रसंगी जबलपूर आयुध भांडरकडून मृतकांच्या परिवारांना आर्थिक मदतीचे वितरण मा. हंसराजजी अहिर व खासदार रामदास जी तडस , भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने व वैशालिताई येरावार यांनी केली. शेवटी मंत्री महोदयांनी काल अपघात झालेल्या स्थळाला भेट दिली तिथे पुलगाव सी.ए. डि. अधिकारी, जबलपूर कॅम्प चे अधिकारी, जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे व एस्. डि. ओ. वर्धा, ठाणेदार श्री. ठाकूर साहेब व जिल्हाप्रशासनाचे अनेक अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी बकाने यांनी कालच्या अपघातात सर्वश्री दोषी असलेल्या ठेकेदारावर गंभीर कारवाही करून मृतकांच्या परिवारांना व जखमींना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या प्रसंगी श्री. राहुल चोपडा, किशोर गव्हाळकर, प्रवीण सावरकर, प्रशांत इंगळे तिगावकार, समीर ढोक, गंगाधर राऊत इत्यादी लोक उपस्थित होते. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर