उनी कपड्यांचा बाजार ‘थंडा’वला

By Admin | Updated: October 27, 2016 00:46 IST2016-10-27T00:46:58+5:302016-10-27T00:46:58+5:30

दिवाळी सणाच्या आगमणावर थंडीची चाहुल लागते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून आकाशात ढगांचे मळभ दाटले आहे.

Uni clothes market 'Thanda' | उनी कपड्यांचा बाजार ‘थंडा’वला

उनी कपड्यांचा बाजार ‘थंडा’वला

थंडीची प्रतीक्षा : लुधियाणा, कर्नाटकहून विक्रेते डेरेदाखल
श्रेया केने  वर्धा
दिवाळी सणाच्या आगमणावर थंडीची चाहुल लागते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून आकाशात ढगांचे मळभ दाटले आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात जाणवणारी थंडी आता ओसरल्यासारखी वाटत आहे. याचा परिणाम उनी कपड्याच्या बाजारपेठेवर दिसून येत आहे. शहरात दरवर्षी नेपाळ, तिबेटहून उनी कपड्यांचे विक्रेते येतात. यात यंदा लुधियाना आणि कर्नाटक येथील विक्रेत्यांची भर पडली आहे. विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे तर उनी कपडे खरेदी करण्यासाठी वर्धेकर थंडी पडण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे जाणवते.
आॅक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या व्यापाऱ्यांचा येथे मुक्काम असतो. या चार महिन्यांच्या काळात लोकरीचे, उनी कपडे विकले जातात. नगर परिषद जुनी इमारत परिसरात ही दुकाने थाटली जातात. अनेक वर्षापासून हाच परिसर उनी कपड्यांचा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. आजकाल कापड विक्रीच्या दुकानातही स्वेटर उपब्ध असतात. त्यामुळे आजकाल बरेचसे ग्राहक या बाजारात येऊन कपडे खरेदी करेलच असे दिसून येत नाही. त्यामुळे काही वर्षांपासून येथे येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते, असे असले तरीही या उनी कपड्यांच्या बाजाराचे महत्व आजही अबाधित आहे. यात यंदा लुधियाणा आणि कर्नाटक येथील व्यापारी दाखल झाले आहे. यातही कंवाटी पद्धत पाहायला मिळते. स्थानिक बेरोजगारांच्या माध्यमातून या व्यापाऱ्यांशी उनी कपड्यांची विक्री सुरू केले आहे. या कपड्यांच्या विक्रीतून बेरोजगारांना कमीशन दिले जात असल्याची ‘लोकमत’ सोबत बोलताना दिली. उनी कपड्यांचा बाजार ‘गरम’ होण्यासाठी थंडीची प्रतीक्षा आहे.

आॅनलाईन शॉपिंगचा फटका
आजकाल आॅनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड आहे. मोबाईलमुळे आॅनलाईन खरेदी करणे खुपच सुसह्य झाले आहे. यात विविध साईट्स असल्याने घरबसल्या ग्राहकांना विविध ब्रॅन्डचे आणि विविध बनावटीचे कपडे निवडीचे स्वातंत्र्य असते. यात आॅफरची भर पडत असल्याने कमी दरात चांगले कपडे निवडण्याचा पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही अंतर चालत जाऊन उनी कपडे खरेदी करण्याऐवजी घरबसल्या कपडे खरेदी होत असल्याने याचाही फटका या बाजाराला बसत आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Uni clothes market 'Thanda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.