वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्याला कामावर पूर्ववत रूजू करा

By Admin | Updated: November 18, 2015 02:23 IST2015-11-18T02:23:13+5:302015-11-18T02:23:13+5:30

सेवाग्राम येथील रुग्णालयात सुक्ष्म जीवशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या जितेंद्र हिरामण गोडघाटे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले.

Undo the medical department staff on the job | वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्याला कामावर पूर्ववत रूजू करा

वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्याला कामावर पूर्ववत रूजू करा

कस्तुरबा हेल्थ सोसायटी व्यवस्थापनाला कामगार संघटनेचे निवेदन
वर्धा : सेवाग्राम येथील रुग्णालयात सुक्ष्म जीवशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या जितेंद्र हिरामण गोडघाटे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्याला कामावर पूर्ववत रुजू करण्याची मागणी नवज्योत कामगार संघटनेने केली आहे.
या मागणीचे निवेदन कस्तुरबा हेल्थ सोसायटी व्यवस्थापन विभागला देण्यात आले. लॅब सेक्शन मायक्रो बॉयलॉजी विभागात कार्यरत असलेले गोडघाटे यांना एकाएकी कामावरून कमी कणर््यात आले. या जागेवर अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यास नियुक्त केल्याची माहिती आहे. कामगार अधिकारी यांच्यासोबत यापूर्वी झालेल्या चर्चेत जितेंद्र गोडघाटे यांना त्वरीत कामावर घ्यावे, अशी मागणी केली. या संदर्भात जितेंद्र गोडघाटे यांना तसे पत्र विभागाकडून देण्यात आले. लेखी स्वरूपात व्यवस्थापनाला पत्र देण्यात आले आहे. शिवाय नोटीस देऊन पूर्ववत कामावर घेण्यासंदर्भात मागणी केली आहे. परंतु त्या पत्राचे व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही. शिवाय कार्यवाहीच्यादृष्टीने ठोस पावले उचलल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे गोडघाटे यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ८ आॅक्टोबरला गोडघाटे यांनी कामावर घेण्याबाबत लेखी अर्ज केला आहे. या विनंती अर्जाचा विचार करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यासह कामगार अधिकारी यांनी गोडघाटे यांना कामावर रुजू करुन घेण्याबाबत दिलेल्या निर्णयावर अंमल करुन गोडघाटे या कर्मचाऱ्यास त्वरीत कामावर रुजु करून घ्यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Undo the medical department staff on the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.