उमरी-लिंगा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:30 IST2018-01-14T23:30:02+5:302018-01-14T23:30:15+5:30
उमरी ते लिंगा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरील जडवाहतूक वाढली असल्याने रस्ता उखडला आहे.

उमरी-लिंगा रस्त्याची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : उमरी ते लिंगा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरील जडवाहतूक वाढली असल्याने रस्ता उखडला आहे.
या मार्गावरील जडवाहतूक अपघात होण्यास कारणीभूत ठरते. पिपरी ते लिंगा मार्गे धावणारी जडवाहने भरधाव असल्याने ग्रामस्थांना रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. जडवाहनांमुळे लिंगा हा डांबरी रस्ता उखडला आहे. गिट्टी बाहेर पडल्याने यावरुन वाहने घसरतात. या मार्गावर अनेक दुर्घटना झाल्या. यानंतर जडवाहतूक सुरू आहे.
पिपरी येथे शासकीय कामाकरिता परिसआतील ग्रामस्थ याच मार्गाने जातात. विद्यार्थी सायकलने या रस्त्यावरून जाताना अनेकदा पडले आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता आवागमन करण्यासाठी त्रासदायक ठरतो. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.
गाडेगाव(रिठ) रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेत
अल्लीपूर - गाडेगाव (रिठ) ते अल्लीपूर या रस्त्याला खडीकरणाची प्रतीक्षा आहे. २०१५-१६ मध्ये मातीकाम केले. केवळ ३ कि.मी. पर्यंतच खडीकरण केले आहे. रस्त्यावरील गोटे उघडे पडल्याने वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. मातीकाम केल्यानंतर मुरूम किंवा गिट्टी, खडी रस्त्यावर न टाकल्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना आवागमन करणे कठीण झाले आहे. बैलबंडी नेताना मोठी अडचण होते. त्यामुळे कमी अंतराचा रस्ता सोडून शेतकऱ्यांना लांबच्या रस्त्याने जावे लागते. या रस्त्याचा शेतकऱ्यांना फायदा कमी आणि नुकसान अधिक अशी अवस्था आहे. रस्त्याचे खडीकरणाचे काम निकृष्ट केले आहे. बैलबंडी शेतात नेता येत नाही. त्यामुळे शेतकºयांची मोठी अडचण होत आहे. या रस्त्याचे ५ कि.मी अंतरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.