गुरूवारी खासदार करणार लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:44 IST2018-04-11T23:44:22+5:302018-04-11T23:44:22+5:30
लोकसभा व राज्यसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सलग चार आठवडे बंद पाडून कुठलीही चर्चा न करता विरोधकांनी लोकशाहीची विटंबना केली. याचा जाहीर निषेध म्हणून भाजपाचे खासदार लाक्षणिक उपोषण करणार आहे.

गुरूवारी खासदार करणार लाक्षणिक उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा व राज्यसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सलग चार आठवडे बंद पाडून कुठलीही चर्चा न करता विरोधकांनी लोकशाहीची विटंबना केली. याचा जाहीर निषेध म्हणून भाजपाचे खासदार लाक्षणिक उपोषण करणार आहे. खा. रामदास तडस देखील जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत.
अपूर्ण माहितीच्या आधारे माध्यमांमार्फत खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चेची तयारी दर्शविली नाही. कुठल्याही कारणातून केवळ संसद बंद करणे, एवढाच उद्देश विरोधी पक्षाने ठेवला होता. विविध मुद्यांवर चर्चा करण्यास सत्ताधारी पक्ष तयार असताना संसद प्रक्रिया बाजूला ठेवून विधायक चर्चा न करता चार आठवडे सभागृह बंद पडल्याने संसद काळातील मानधन सर्व भाजप खासदारांनी परत केले आहे.
सभागृहात मुद्देसुद चर्चा केल्यास विरोधी पक्षाचे पितळ उघडे पडणार होते. यामुळे सभागृह बंद केले जात असल्याचेही खा. तडस यांनी नमूद केले आहे. याचा निषेध म्हणून भाजपा खासदार उपोषण करणार असून कार्यकर्तेही बसणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.