जुनापाणी चौकातील प्रकार : अपघातामुळे झाली दैना

By Admin | Updated: July 9, 2015 02:17 IST2015-07-09T02:17:20+5:302015-07-09T02:17:20+5:30

शहराबाहेरील वळणमार्गाला सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. या मार्गावरील जुनापाणी चौकातील दुभाजकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

Types of old shoes: Due to accident | जुनापाणी चौकातील प्रकार : अपघातामुळे झाली दैना

जुनापाणी चौकातील प्रकार : अपघातामुळे झाली दैना

भंगलेले दुभाजक अपघातास कारण
वर्धा : शहराबाहेरील वळणमार्गाला सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. या मार्गावरील जुनापाणी चौकातील दुभाजकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील काही दुभाजक भंगले असून वाहनांच्या धडकेत काही दुभाजक भुईसपाट झाले आहेत; पण याची दुरूस्ती करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसते.
शहरातून होणारी जड वाहतूक या मार्गाने वळती करून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण या मार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस भर पडत आहे. शिवाय रस्त्याची डागडुजी होत नसल्याने रस्ता उखडला आहे. परिणामी, वाहने चालविताना खबरदारी घ्यावी लागते. या मार्गावर येत असलेल्या चौकाच्या ठिकाणी दुभाजक तयार करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असला तरी हे दुभाजक नष्ट झाल्याचे दिसतात. वाहनांची धडक लागून दुभाजक क्षतिग्रस्त झाले आहे. यामुळे चारही बाजूने वाहने भरधाव येतात. यात अपघाताचा धोका असतो. वाहनांची गती अधिक राहत असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी होते. जुनापाणी चौकात आजवर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या समस्येची दखल घेत दुभाजकांचे बांधकाम करून वाहन चालकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Types of old shoes: Due to accident