चाकूच्या धाकावर रोख रक्कम पळविणारे दोघे तरूण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:00 AM2020-11-29T05:00:00+5:302020-11-29T05:00:12+5:30

गोपयीन माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी रिमडोह शिवारातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रोहित उर्फ रितेश जगन्नाथ डेकाटे (१९) व सायमन अ‍ॅन्थोनी फ्रान्सीस (१९) दोन्ही रा. सुयोगनगर अजनी, नागपूर यांना अटक केली आहे.

Two youths arrested for smuggling cash at knife point | चाकूच्या धाकावर रोख रक्कम पळविणारे दोघे तरूण जेरबंद

चाकूच्या धाकावर रोख रक्कम पळविणारे दोघे तरूण जेरबंद

Next
ठळक मुद्देहिंगणघाट पोलिसांची कामगिरी : नागपूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची दिली कबुली

    लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : चाकूच्या धाकावर रोख पळविणाऱ्या चाेरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये हुडकून काढत अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनीचोरीचा मुद्देमाल जप्त केला असून या चोरट्यांनी नागपूर जिल्ह्यात केलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजकुमार अशोक गौळकार रा. शास्त्री वॉर्ड हिंगणघाट हे दुचाकीने रेल्वे उड्डाण पुलावरून शासकीय रुग्णालय चौककडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना वाटेत अडविले. हे अज्ञात व्यक्ती इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवत राजकुमार यांच्या जवळील दोन हजारांची रक्कम हिस्कावून पळ काढला. त्यानंतर रामकुमार यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात केली. गोपयीन माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी रिमडोह शिवारातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रोहित उर्फ रितेश जगन्नाथ डेकाटे (१९) व सायमन अ‍ॅन्थोनी फ्रान्सीस (१९) दोन्ही रा. सुयोगनगर अजनी, नागपूर यांना अटक केली आहे. या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास नागपूर जिल्ह्यात एअरपोर्ट चौक नागपूर येथेही चाकूच्या धाकावर रेाख व मोबाईल पळविल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ही कारवाई एसपी प्रशांत होळकर, एसडीपीओ भीमराव टेळे, ठाणेदार पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, उमेश बेले यांनी केली.

चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही चक्क चोरीचीच
अधिक चौकशीदरम्यान या चोरट्यांनी नागपूर जिल्ह्यातील एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चोरीच्या दुचाकीचा वापर गुन्ह्यात केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. दुचाकी चोरीबाबत बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

दोघे नागपूर शहरातील सराईत गुन्हेगार
अटक केलेले दोन्ही तरुण हे नागपूर शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचे हिंगणघाट पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यांच्याकडून एकूण ७० हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Two youths arrested for smuggling cash at knife point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.