स्प्रिंकलरच्या अनुदानासाठी दोन वर्षांपासून फेर्या
By Admin | Updated: May 23, 2014 00:08 IST2014-05-23T00:08:59+5:302014-05-23T00:08:59+5:30
शासनाच्या योजनेनुसार ज्यांच्या शेतात ओलिताची सोय आहे त्या शेतकर्यांनी स्प्रिंकलर घेतले. मात्र या योजनेचा लाभ उचलणार्या शेतकर्यांना अनुदानाकरीता कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.

स्प्रिंकलरच्या अनुदानासाठी दोन वर्षांपासून फेर्या
वर्धा : शासनाच्या योजनेनुसार ज्यांच्या शेतात ओलिताची सोय आहे त्या शेतकर्यांनी स्प्रिंकलर घेतले. मात्र या योजनेचा लाभ उचलणार्या शेतकर्यांना अनुदानाकरीता कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. असाच अनुभव येथील हर्षल रमेश झाडे नामक शेतकर्याला आहे. ते गत दीड महिन्यापासून अनुदानाकरिता त्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. हर्षल झाडे हे वर्धेला राहतात. त्यांची देवळी तालुक्यातील बोपापूर(दिघी) येथे साडेआठ एकर शेती आहे. शेतात त्यांनी सेंद्रीय भाजीपाला लावला आहे. हर्षल झाडे यांनी देवळीतील साई मशिनरीमधून अनुदानावर स्प्रिंकलर खरेदी केले होते. सर्व मशीनरीने याचा प्रस्ताव देवळी येथील कृषी विभागाकडे पाठविला. याला तीन महिने लोटूनही अनुदान प्राप्त न झाल्याने हर्षल झाडे देवळी येथील कृषी विभागात गेले, तिथे विचारले असता कर्मचार्यांनी त्यांना तुमच्या अनुदानाचा धनादेश आज किंवा उद्या येईल असे सांगितले. सोबतच तुमचा प्रस्ताव १०० टक्के पूर्ण झाला आहे. तसा एसएमएस तुमच्या मोबाईलवर येईल असे सांगितले. एसएमएस आला नसल्याने हर्षल झाडे परत कृषी विभागात गेले असता तुमच्या प्रस्तावात त्रुट्या आल्याने प्रस्ताव पुन्हा डिलरकडे पाठविण्यात आला असल्याचे लेखा विभागातील एका महिला कर्मचार्याने सांगितले. पहिले प्रस्ताव १०० टक्के झाल्याने सांगून दुसर्यांदा त्रुट्या कशाकाय निघू शकतात. असा प्रश्न उपस्थित होत आहे. झाडे डिलरकडे गेले असता डिलरने सांगितले की ही आमची सेवा आहे आमच्यावर दबाव टाकू नका; परंतु, डिलरनेच प्रस्ताव उशीरा पाठवला. आता जवळपास दोन वर्षे होत आले. अद्यापही अनुदान प्राप्त झाले नाही. या प्रकरणाचा निकाल लावून चौकशी करून अनुदान देण्याची मागणी हर्षल झाडे यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)