बलात्कार प्रकरणी दोघांना २० वर्षे सश्रम कारावास
By Admin | Updated: February 16, 2017 01:18 IST2017-02-16T01:18:16+5:302017-02-16T01:18:16+5:30
येथील सुदामपुरी परिसरात फुल तोडण्याकरिता गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर बळजबरी करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बलात्कार प्रकरणी दोघांना २० वर्षे सश्रम कारावास
जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : अल्पवयीन मुलीवर केली होती बळजबरी
वर्धा : येथील सुदामपुरी परिसरात फुल तोडण्याकरिता गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर बळजबरी करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विनोद बापु जाधव व सुनील राजू जाधव दोन्ही रा. वडार झोपडपट्टी अशी शिक्षा ठोवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा निकाल विशेष सत्र न्यायाधीश अंजली खडसे यांनी बुधवारी दिला.
या बाबत थोडक्यात अशी की, २६ सप्टेंबर २०१४ रोती पहाटे ५ वाजताच्या सुमारास १५ वर्षीय पीडिता सायकलने सुदामपुरी परिसरात गोडे यांच्या घरामागे असलेल्या नगर परिषदेच्या मैदानात असलेल्या झाडावर फुले तोडण्याकरिता गेली होती. दरम्यान विनोद सुनील या दोघांनी तिला बळजबरीने पकडले. या दोघांच्या तावडीतून तिने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र ती असफल ठरली. यावेळी दोघांनीही तिच्यावर बळजबरी केली.
तीने घरी पोहोचताच झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावरून तिच्या परिवारातील सदस्यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भांदविच्या कलम ३७६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाअंती तत्कालीन ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी प्रकरण न्यायसप्रविष्ट केले.
सदर प्रकरण साक्ष पुराव्याकरिता न्यायाधीश अंजली खडसे यांच्या न्यायालयात आले. या प्रकरणात एकूण आठ साक्षदार तपासण्यात आले. यात दोन्ही आरोपी दोषी असल्याचे दिसून आले. यावरून न्यायाधीशांनी विनोद जाधव व सुनील जाधव या दोघांना भादंविच्या कलम ३७६ (ड) अन्वये २० वर्षे सश्रम करावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडिताला देण्याचे आदेश न्यायालयाने पारीत केले आहेत.
या प्रकरणात प्रारंभी काही साक्षीदार तत्कालीन सरकारी अभियोक्ता अर्चना वानखेडे यांनी तपासले तसेच उर्वरीत साक्षीदार व युक्तीवाद सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी केला. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उज्वला देवकर यांनी केला. तसेच सदर प्रकरणात साक्षीदारांना हजर करण्याची जबाबदारी सहायक पोलीस उपनिरीक्षक माळोदे व जमादार भगत यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)