दोन वर्षांचा राधे दाखवतो नकाशावरील ३१ देश

By Admin | Updated: August 15, 2015 02:08 IST2015-08-15T02:08:54+5:302015-08-15T02:08:54+5:30

एकविसाव्या शतकात इंटरनेटसारख्या वेगवान माध्यमामुळे जग आणखी जवळ आलं आहे.

Two-year-old Radhe displays 31 countries on the map | दोन वर्षांचा राधे दाखवतो नकाशावरील ३१ देश

दोन वर्षांचा राधे दाखवतो नकाशावरील ३१ देश

बुद्धिमत्तेची चुणूक : अद्याप त्याला शब्दांची पुरती ओळखही नाही
पराग मगर  वर्धा
एकविसाव्या शतकात इंटरनेटसारख्या वेगवान माध्यमामुळे जग आणखी जवळ आलं आहे. असे असतानाही या जगात देश किती हा प्रश्न एखाद्याने आपल्याला विचारला तर बोटावर मोजता येतील एवढे देशही आपण सांगू शकणार नाही. पण वर्धेतील दोन वर्षांचा चिमुकला राधे नकाशावरील लहान मोठे ३१ देश ओळखून दाखवितो. शब्दांची व रंगांचीही पूर्णत: ओळख नसलेला राधे हे कसे करतो हे एक कोडेच असून यातून त्याची असामान्य बुद्धिमता प्रत्ययास येते.
राधे विक्रांत रोटकर हा केवळ दोन वर्षांचा मुलगा. अद्याप स्पष्ट बोलणही त्याला जमत नाही. इंग्रजीचे ए बी सी डी हे चारच शब्द त्याला थोडेफार कळतात. त्याचे वडील विक्रांत रोटकर हे पेशाने तंत्रज्ञान विषयाचे प्राध्यापक. त्यांचा भुगोल विषय तसा कच्चाच. पण अवकाश ज्ञानाची मोठी आवड. आपल्या मुलाला भारत देश तरी कळावा या माफक अपेक्षेने त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना ‘ग्लोब’ विकत आणला आणि मुलगा राधे याला भारत देश त्यात दाखविला. त्या दिवसापासून राधे दररोज न चुकता वडील घरी आले की त्यांना त्या ग्लोबवर भारत दाखवायचा. त्यामुळे आवड बघून त्यांनी स्वत: अभ्यास करून मुलाला वेगवेगळे देश दाखवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे अल्प काळातच तो झपाट्याने ग्लोब वरील सर्व नकाशे दाखवू लागला. आज तब्बल ३१ देश राधे कधीही केव्हाही विचारले तरी ग्लोबवर अचूक दाखवितो. जगाच्या नकाशावर असलेले देश एखाद्याने सांगितल्यावर शोधणे मोठ्या माणसांनाही सांगणे कठीण जाते; परंतु राधे लहानातला लहान देश अचूक दाखवितो. नकाशावर असलेल्या देशांच्या रंगांमध्ये खूप फरक नाही आणि अक्षरज्ञानही नसल्याने राधे एवढे सगळे देश लक्षात ठेवतो कसे हे कोडेच आहे. अद्याप शब्दांची ओळखही नाही
राधेला अद्याप शब्दांची ओळखही नाही. रंगांचे ज्ञान असले तरी ग्लोबवर बरेचसे देश हे समान रंगानीच दाखविले आहे. फरक आहे तो केवळ आकारांचा.
आजघडीला राधे ग्लोबवरील भारत, चीन, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, श्रीलंका, अलास्का, आॅस्टे्रलिया, पेरू, ब्राझिल, मादागास्कर, न्युझिलंड, फिलिपाईन्स, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, पोलंड, ग्रीनलँड, मेक्सिको, अल्जेरिया, थायलंड, अर्जेंटिना, अंटार्टिका, लिबिया, कोलंबिया, उत्तर अमेरिका, द. अमेरिका, क्युबा, सोमानिया आणि इजिप्त हे देश ओळखतो. अद्याप यातील अनेक देश मुलांच्या गावीही नसताना राधे हे देश कुठल्याही क्रमाने विचारले तरी सांगतो.
अद्याप शब्दांची ओळखही नाही

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. हाच प्रकार राधे बाबत दिसत असल्याचे दिसते. तबला म्हणजे नेमके काय हे देखील नीट माहिती नसलेला राधे गाण्याच्या तालावर तबल्याचा अचूक ठेका धरतो. त्याच्या वडिलांनी तबला वादनाच्या काही चित्रफिती त्याला दाखविल्या असता तो तशाच प्रकारचा तबला वाजविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट पाहताक्षणीच त्याला लगेच आत्मसाद करण्याचा राधे चा कसब साऱ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.

Web Title: Two-year-old Radhe displays 31 countries on the map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.