अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी
By Admin | Updated: November 27, 2014 23:38 IST2014-11-27T23:38:56+5:302014-11-27T23:38:56+5:30
येथील नागपूर मार्गावर असलेल्या जीएम मोटर्स व आदिती मेडिकल जवळ झालेल्या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडल्या.

अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी
एक सायकलवर तर दुसरी होती दुचाकीवर
वर्धा : येथील नागपूर मार्गावर असलेल्या जीएम मोटर्स व आदिती मेडिकल जवळ झालेल्या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडल्या. दोन्ही अपघातात पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. या अपघातामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
नागपूर मार्गावरील जीएम मोटर्स जवळ झालेल्या अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीवर जात असलेल्या एका विद्यार्थिनीला धडक दिली. यात ती जखमी झाली. सदर विद्यार्थिनीला तिच्या कुटुंबीयाने रुग्णालयात दाखल केले. दुसरा अपघात शिवाजी चौक परिसरात असलेल्या आदिती मेडिकल जवळ घडला. यात न्यु इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली. सदर विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर सायकलने घराकडे जात होती. दरम्यान एम एच ३२ बी ८३३२ क्रमांकाच्या आॅटोने तिला धडक दिली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी तिला रुग्णालयात नेवून तिच्यावर उपचार केले. या अपघातातही आॅटो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनेत गुन्हा दाखल नसल्याने जखमींची नावे कळू शकली नाही. (प्रतिनिधी)