वीज कोसळून दोन महिला ठार; सात जखमी
By Admin | Updated: June 1, 2017 20:09 IST2017-06-01T20:09:11+5:302017-06-01T20:09:11+5:30
तालुक्यातील वाढोणा शिवारात दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने

वीज कोसळून दोन महिला ठार; सात जखमी
>ऑनलाइन लोकमत
आर्वी (वर्धा), दि. 01 - तालुक्यातील वाढोणा शिवारात दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या. तसेच, सात जण जखमी आहे.
राजू नासरे यांच्या शेतात भूर्इंमुग काढण्याचे काम सुरू असताना सदर घटना घडली. शशीकला पुंडलिक पोटे (५०), कल्पना निरंजन दाताळकर दोघी रा. वाढोणा अशी मृतकांची नावे आहे. तर माधुरी सुनिल पोटे, राजू गोविंदराव नासरे आणि शुभांगी लोणकर हे तिघे गंभीर जखमी आहे.
सदर तिघांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. याशिवाय लता साहेबराव शेवतकर, शुभांगी संजय बावने, अर्पणा महेंद्र बारई, शेखर संजय बावने हे चार जण जखमी झाले.