शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक दुचाकीच्या दोन अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 22:22 IST

देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे. भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एम.एच. ३२ एल. ३५५ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली.

ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी : भिडी व कारंजा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी/कारंजा (घा.) : देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे.भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एम.एच. ३२ एल. ३५५ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही दोन्ही वाहने यवतमाळकडून देवळीच्या दिशेने येत होते. या अपघातात दुचाकीचालक अविनाश राऊत (२८) रा. मुरदगाव (येसगाव) हा युवक ट्रकच्या चाकात येवून जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेले त्याची मामी शालिनी सोनवणे (४०) रा. नाचणगाव ही गंभीर जखमी झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.कारंजा (घा.) येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.गणेश नामदेव येरपुडे (३२) असे मृतकाचे नाव असून विलास वामन कुमेरिया (२७) हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही जऊरवाडा (खुर्द) येथील रहिवासी असून एम.एच. ३२ डब्ल्यू ९५५६ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजा येथील गोळीबार चौकातून कारंजा मार्केटकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाने नागपुरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या सी.जी. ०४ जे.डी.५०५६ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत गणेशच्या पायावरुन ट्रक गेल्याने गुडघ्यापासून पाय वेगळा झाला.तसेच विकासही गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नागपुरकडे रवाना केले. परंतु नागरपुच्या मेडीकल हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. तर विकासवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चालकाला अटक करुन ट्रक जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू