दोन चोरटे जेरबंद, अडीच लाखांचा माल जप्त
By Admin | Updated: November 4, 2016 01:44 IST2016-11-04T01:44:53+5:302016-11-04T01:44:53+5:30
कवठा शिवारातील व्होडाफोन कंपनीच्या टॉवरजवळ असलेल्या बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या.

दोन चोरटे जेरबंद, अडीच लाखांचा माल जप्त
वर्धा : कवठा शिवारातील व्होडाफोन कंपनीच्या टॉवरजवळ असलेल्या बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. यासह अन्य तीन गुन्हे पुलगाव पोलीस ठाण्यात दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास करताना पुलगाव पोलिसांनी दोन चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कवठा शिवारात व्होडाफोन कंपनीचे टॉवर आहे. तेथे लोखंडी टिनाचे शेड बांधून टॉवरकरिता लागणाऱ्या बॅटऱ्या ठेवून होत्या. तीन महिन्यांपूर्वी बॅटऱ्या ठेवून असलेल्या लोखंडी टिनाचा पत्रा कापून अज्ञात चोरट्यांनी बॅटऱ्या पळविल्या होत्या. याबाबत पुलगाव ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपास करूनही चोरटे हाती लागत नव्हते. अशीच एक चोरी काही दिवसांपूर्वी झाली.
दोन्ही चोरटे वर्धा शहरातील
वर्धा : यावरून पुलगावचे ठाणेदार एम.पी. बुराडे यांनी विशेष पथक कार्यान्वित करून तपास सुरू केला. प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे शेख रफीक शेख रशिद (३४) रा. गिरीपेठ वर्धा व चंदन उर्फ मंगेश उर्फ बिल्ला सुभाष कांबळे (२८) रा. भिमनगर वर्धा याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या एकूण २२ बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेले वाहन क्र. एम.एच. ३२ क्यू. ३१३७, चोरीचे साहित्य पाना, पेंचीस, हॅन्डग्लोज, कटर आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एम.पी. बुराडे, धिरज राजुरकर, जमादार प्रकाश लसुंते, संजय रिठे, विवेक बनसोड, किशोर लभाने, भारत पिसुड्डे आणि सुशांत देशमुख यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)
नाल्या तुंबल्या
वर्धा : रामनगर परिसरातील नाल्या तुंबल्याने येथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेण्याची मागणी आहे.