लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या अरुंद मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस समोरासमोर धडकल्या. हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजतादरम्यान येथील एस. एस. एन. जे.महाविद्यालया समोरील उड्डापुलाजवळ झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरुप बचावले.येथील बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन जाण्याऐवजी खालच्या अरुंद मार्गाने एम.एच. ४० ऐ.जी. ६३२८ क्रमांकाची अमरावती-अहेरी बस देवळीमार्गे वर्धेकडे जात होती. तर एम.एच. ४० एन ८४९९ क्रमांकाची वर्धा-पुलगाव बस वर्धेकडून देवळीकडे येत होती. या दोन्ही बस समोरासमोर आल्याने धडक झाली. या अरुंद मार्गाने एकाच वेळी दोन बस जात नसतानाही चालकाच्या अतिआत्मविश्वासामुळे हा अपघात झाला. दोन्ही बस एकमेकांना भिडल्याने जागेअभावी प्रवाशांना बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यामुळे चालकाच्या केबीनमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात सर्व प्रवाशी सुखरुप बचावले. या महामर्गाच्या चुकीच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील उड्डाणपुलाच्या बाजुने जाणारा मार्ग अतिशय अरुंद असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. एक जरी मोठे वाहन आले तर या मार्गावर वाहतुकींची कोंंडी होते. त्यामुळे लक्ष देत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
अरूंद मार्गावर दोन एसटीची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST
येथील बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन जाण्याऐवजी खालच्या अरुंद मार्गाने एम.एच. ४० ऐ.जी. ६३२८ क्रमांकाची अमरावती-अहेरी बस देवळीमार्गे वर्धेकडे जात होती. तर एम.एच. ४० एन ८४९९ क्रमांकाची वर्धा-पुलगाव बस वर्धेकडून देवळीकडे येत होती. या दोन्ही बस समोरासमोर आल्याने धडक झाली.
अरूंद मार्गावर दोन एसटीची धडक
ठळक मुद्देमोठा अपघात टळला : प्रवासी सुखरुप बचावले