दोन घरातून रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

By Admin | Updated: December 26, 2016 01:48 IST2016-12-26T01:48:41+5:302016-12-26T01:48:41+5:30

मध्यरात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वर्धा शहर परिसरातील दोन वेगवेगळ्या

Two silver and gold coins with cash are missing | दोन घरातून रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

दोन घरातून रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

पुलफैल आणि जाकीर हुसेन परिसरातील घटना
वर्धा : मध्यरात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वर्धा शहर परिसरातील दोन वेगवेगळ्या भागातील घरातून रोखसह सोन्या-चांदीचा मुद्देमाल लंपास केला. या दोन्ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्या असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
स्थानिक पुलफैल भागातील धनंजय दादाराव करोडे (३०) यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश मिळविला. चोरट्यांनी करोडे यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवून असलेले ३४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच धनंजय करोडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसरी घटना शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जाकीर हुसेन कॉलनी परिसरात घडली. जाकीर हुसेन कॉलनी येथील रोशनी मिलिंद खोब्रागडे (४७) यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील आलमारीतील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याचे २० नग मनी, दोन चांदीचे कडे, तोरड्या, सोन्याची नथ, रोख १ हजार ५०० रुपये व इतर साहित्य असा एकूण १७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची रोशनी खोब्रागडे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Two silver and gold coins with cash are missing