शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

जबरी चोरी करणाऱ्या ‘इराणी’ टोळीतील दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST

दारोडा टोल नाक्याजवळ दोन व्यक्ती दुचाकीने फिरताना दिसून आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे सात मोबाईल मिळून आले. त्यांनी शेख साखी जहांगीर बाशा (३३) रा. गंगानगर आणि मोहम्मद शब्बर मोहम्मद शब्बीर (१९) रा. बांगरडीपल्ली, आंध्रप्रदेश अशी नावे सांगितली. दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केली असता दुचाकी निझामाबाद जिल्ह्यातील दासनगर, बोरगाव येथून चोरल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देडी.बी.पथकाची कारवाई : आरोपींकडून २ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील विविध परिसरात दुचाकीने फिरुन दोघांनी तीन मोबाईल लंपास केल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाली. या तक्ररीच्या आधारे डी. बी. पथकाने तपासचक्र फिरविले असता जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय ‘इराणी’ टोळीतील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.हिंगणघाट पोलीस ठाण्यात ६ एप्रिलला सायंकाळी मोबाईल चोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख शेखर डोंगरे व त्यांच्या सहकाºयांनी शहरासह लगतच्या परिसरात आरोपींचा शोध घेतला असता, यातील आरोपी नांदगाव चौकाकडून वडनेरकडे गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वडनेर मार्गाने शोध घेत असताना दारोडा टोल नाक्याजवळ दोन व्यक्ती दुचाकीने फिरताना दिसून आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे सात मोबाईल मिळून आले. त्यांनी शेख साखी जहांगीर बाशा (३३) रा. गंगानगर आणि मोहम्मद शब्बर मोहम्मद शब्बीर (१९) रा. बांगरडीपल्ली, आंध्रप्रदेश अशी नावे सांगितली. दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केली असता दुचाकी निझामाबाद जिल्ह्यातील दासनगर, बोरगाव येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच अदिलाबाद येथील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची चैन व तीन मोबाईल हिंगणघाट शहरातून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक करुन त्यांच्याकडील सोन्याची चैन, सात मोबाईल, एक दुचाकी व रोख असा एकूण २ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून हिंगणघाटमधील एक तर तेलंगणा राज्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहे. हे इराणी टोळीतील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध राज्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगितले. ही कारवाई हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अमोल लगड यांच्या मार्गदर्शनात शेखर डोगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, विजय काळे यांनी केली. 

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस