दोन अपघातात दोन ठार
By Admin | Updated: April 25, 2016 23:23 IST2016-04-25T23:09:13+5:302016-04-25T23:23:02+5:30
अहमदनगर : भरधाव वेगात जाणाऱ्या बसने जोराची धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.

दोन अपघातात दोन ठार
अहमदनगर : भरधाव वेगात जाणाऱ्या बसने जोराची धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बसने पायी जात असलेल्या लता नामदेव धायतडक (वय ४८, रा. शाहूनगर, केडगाव) यांना जोराची धडक दिली. ही घटना रविवारी रात्री पुणे रोडवर हॉटेल संदीपसमोर घडली. दुसऱ्या अपघातात जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक दिली. नगर-पाथर्डी रोडवरील पिंपळगाव लांडगा शिवारात शनिवारी रात्री हा अपघात झाला. नजीर शेख (वय ६०, रा. आलमगीर, भिंगार) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)