कारच्या धडकेत दोन ठार
By Admin | Updated: October 22, 2016 22:46 IST2016-10-22T22:44:55+5:302016-10-22T22:46:09+5:30
एक जखमी : रायगडनगर शिवारात अपघात

कारच्या धडकेत दोन ठार
बेलगाव कुऱ्हे : मुंबई-नाशिक-रायगडनगर परिसरात दोन दुचाकी व हीरोहोंडा सिटी कार यांच्या अपघातात दोन ठार, तर एक जखमी झाला आहे. नाशिककडे जाणाऱ्या हीरोहोंडा सिटी कारने (एमएच ४ ईव्ही ८०७२) दुचाकी शाईन (एमएच १५ ईव्ही १७०१) व हीरोहोंडाला (एमएच १५ बीजी ९१४८) जोरात धडक दिल्याने एकमेकांच्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील जालिंदर सुरेश रायकर (३३) तर दुसरा दुचाकीस्वार ठार झाला त्याची ओळख अजून पटलेली नाही. सिडको येथील हर्षल नाना पाटील हे अपघातात जखमी झाले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. वाडीऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फड, डावखर करीत आहेत. (वार्ताहर)