दोन अपघातात दोघे ठार; दोन गंभीर
By Admin | Updated: November 22, 2014 23:05 IST2014-11-22T23:05:55+5:302014-11-22T23:05:55+5:30
नागरी-वरोरा मार्गावर दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. यात एक जण जागीच ठार झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दोन अपघातात दोघे ठार; दोन गंभीर
नागरी-वरोरा मार्गावर अपघात : दुचाकी एकमेकांवर आदळल्या
हिंगणघाट: नागरी-वरोरा मार्गावर दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. यात एक जण जागीच ठार झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव दादाजी नारायण भट असे असून जखमीचे नाव सुनील लक्ष्मण मोहिते (३०) व शेख आरीफ मौलाना शेख असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाघोली येथील दादाजी नारायण भट (६८) हे नागरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गत १० वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्याने सध्या हिंगणघाच्या दत्त मंदिर वॉर्डातील रहिवासी आहेत. आज ते नागरीवरून हिंगणघाटला येत असताना त्यांच्या दुचाकीला हिंगणघाट वरून नागरीकडे जाणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात दादाजी भट जागीच गतप्राण झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील सुनील लक्ष्मण मोहिते (३०) व शेख आरीफ मौलाना शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले. ते दोघेही नागपूरच्या ताजुद्दीनबाबाचे दर्शन घेवून नागरीला परत जात होते. या दोघांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)