शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दोन अपघातात दोन ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 23:46 IST

समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव शिवारात भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाला. तर आर्वी तालुक्यातील मजरा येथे भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिली. यात एक शेतकरी ठार झाला.

ठळक मुद्देहळदगाव आणि मजरा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/आकोली : समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव शिवारात भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाला. तर आर्वी तालुक्यातील मजरा येथे भरधाव ट्रकने बैलगाडीला धडक दिली. यात एक शेतकरी ठार झाला. सदर दोन्ही अपघातांची नोंद पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, जामकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ए. पी. १६ वाय ३७९९ क्रमांकाच्या ट्रकचा हाऊजिंग जॉईट तुटल्याने हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग ७ वर हळदगाव शिवारात रस्त्याच्याकडेला उभा होता. ट्रक चालक मारोती कोल्हे (३४) रा. ठिगुडी आसिफाबाद, तेलंगणा आणि क्लिनर सुरेश वाढई हे वाहनाला नेमके काय झाले ते कसे व्यवस्थित करता येईल यासाठी वाहनाखाली उतरुन प्रयत्न करीत असतानाच मागाहून येणाºया एम. एच. ३४ बी. जी. ३५९४ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने या ट्रकला जोरदार धडक दिली. यात क्लिनर सुरेश वाढई हा जागीच ठार झाला तर नादुरूस्त ट्रकचा चालक मारोती कोल्हे हे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका जोरदार होता की धडक होताच वाहन रस्ता दुभाजकावर चढले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला मिळेल त्या वाहनाने सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात विनायक खेकडे, मनोहर मुडे, विलास नेहारे, राहुल पुरी, घवघवे करीत आहेत. तर सेलू तालुक्यातील आकोली नजीकच्या मजरा शिवारात बस स्थानकासमोर भरधाव ट्रकने बैलबंडीला धडक दिली. यात शेतकरी भिकुजी उकंडराव ढवळे (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी भिकूजी हे नेहमीप्रमाणे सकाळी भाजी-भाकरची शिदोरी सोबत घेवून बैलगाडीने शेतात जात होते. बैलगाडी मजरा बस स्थानका जवळ येताच मागाहून येणाऱ्यां एच. आर. ०१ जी. एफ. ८५६३ क्रमांकाच्या ट्रकने बैलगाडीला जबर धडक दिली. यात शेतकरी भिकुजी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय बैलगाडीचा चुराडा होत दोन्ही बैलही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस जमादार प्रेमराज बावणे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्र्रकरणी आरोपी ट्रक चालक मुंटाबीर रजाबीर रुजाहसन रा. समनपूर जि. सारंगपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हळदगावच्या घटनेला समुद्रपूर तर मजरा येथील घटनेचा पुढील तपास खरांगणा पोलीस करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू