स्वॅब नमुने घेण्याकरिता दोन तास ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:40+5:30

तुमचे स्वॅब नमुने घ्यायचे आहे, असे सांगून त्यांना खाली थांबायला सांगितले. स्वॅब न घेताच सर्वांच्याच मोबाईलवर स्वॅब कलेक्टचे मॅसेज धडकले. त्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. जवळपास दीड ते दोन तास थांबल्यावरही कुणीच स्वॅब घेण्याकरिता आले नसल्याने नागरिकांनी विचारपूस केली असता ‘आम्हाला तेवढेच काम आहे का’ असेही त्यांना ऐकावे लागले.

Two hours for taking swab samples | स्वॅब नमुने घेण्याकरिता दोन तास ताटकळ

स्वॅब नमुने घेण्याकरिता दोन तास ताटकळ

ठळक मुद्देसामान्य रुग्णालयातील प्रकार : संयमाचा बांध फुटल्याने नागरिकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना आधी सामान्य रुग्णालयात तपासणी करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार काही नागरिक मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यावर त्यांना स्वॅब घेण्याकरिता तब्बल दोन ते अडीच तास बसवून ठेवले. त्यामुळे संयमाचा बांध फुटलेल्या नागरिकांनी तेथील कर्मचाऱ्यांला धारेवर धरत आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाहेर जिल्ह्यातून येणारे व्यक्ती तपासणीकरिता येत आहे. मात्र, या ठिकाणी अपुरा कर्मचारी वर्ग आणि नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी सुद्धा सकाळी दहा वाजतापासून २० ते २५ नागरिक येथे तपासणीकरिता आले होते. प्रारंभी या सर्वांना वरच्या माळ्यावर नेऊन त्यांच्याकडून पूर्ण माहिती भरुन घेण्यात आली. त्यानंतर तुमचे स्वॅब नमुने घ्यायचे आहे, असे सांगून त्यांना खाली थांबायला सांगितले. स्वॅब न घेताच सर्वांच्याच मोबाईलवर स्वॅब कलेक्टचे मॅसेज धडकले. त्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. जवळपास दीड ते दोन तास थांबल्यावरही कुणीच स्वॅब घेण्याकरिता आले नसल्याने नागरिकांनी विचारपूस केली असता ‘आम्हाला तेवढेच काम आहे का’ असेही त्यांना ऐकावे लागले. अखेर दोन तासानंतर नावनोेंदणी करणाराच कर्मचारी स्वॅब घ्यायला आल्याने नागरिकांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. स्वॅब घेतले नाही तरी स्वॅब कलेक्टचे मॅसेज कसे काय पाठविले, असा जाब विचारायला सुरुवात केल्याने रुग्णालयाच्या कर्मचाºयांची भंबेरी उडाली. काहींनी स्वॅब नमुने दिले तर काहींनी येथील व्यवस्थेचे वाभाडे काढत घरचा रस्ता धरला. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठांनी अशा प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे.

उमरीच्या युवकालाही हेलपाटे
शहरालगतच्या उमरी (मेघे) येथील युवक सोमवारला हैद्राबादवरुन आला. त्याने खबरदारी म्हणून तपासणीकरिता लगेच सामान्य रुग्णालय गाठले. दुपारी २ वाजता रुग्णालयात पायदळ आल्यानंतर त्याची माहिती घेऊन आता स्वॅब घेता येणार नाही, असे सांगून मंगळवारी बोलाविले. मंगळवारी आला नाही तर पोलिसांना माहिती देऊ असे सांगण्यात आले. त्यामुळे भीतीपोटी पुन्हा तो युवक मंगळवारी पायदळ दवाखान्यात पोहोचला व त्यालाही आज प्रतीक्षा करावी लागले, असे त्याने सांगितले.

ऑनलाईन नोंदणी केल्याबरोबरच व्यक्तीला स्वॅब कलेक्ट केल्याचा मॅसेज जातो. त्यानुसारच त्यांना स्वॅब घेण्यापूर्वी मॅसेज गेला असेल. आता दिवसेदिवस नागरिकांची संख्या वाढत असल्याने सर्वांची नोंद घेणे, त्यांचे स्वॅब घेणे यात वेळ लागतोच. परंतु, या प्रक्रि येत काही त्रुट्या असेल तर त्या दूर केल्या जाईल. तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: Two hours for taking swab samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.