एकाच गावात दोन ग्रामपंचायत भवन
By Admin | Updated: May 9, 2015 02:01 IST2015-05-09T02:01:20+5:302015-05-09T02:01:20+5:30
तालुक्यातील चिंचोली (डांगे) गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे़ गावात २००८ पर्यंत ..

एकाच गावात दोन ग्रामपंचायत भवन
सुरेंद्र डाफ आर्वी
तालुक्यातील चिंचोली (डांगे) गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे़ गावात २००८ पर्यंत ग्रा़पं़ कार्यालयास स्वतंत्र इमारत नव्हती. यामुळे ग्रा़पं़चे कामकाज जि.प. शाळेच्या इमारतीतून सुरू होते. २००८-०९ मध्ये बाराव्या वित्त आयोगात मंजुरी मिळून इमारतीचे बांधकाम झाले़ यानंतर कामकाज सुरळीत सुरू असताना २०१४-१५ च्या जिल्हा वार्षिक नियोजनातून याच गावात दुसऱ्या ग्रामपंचायत भवनासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे एकाच गावात दोन ग्रामपंचायत भवन कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
तालुक्यातील चिंचोली (डांगे) या गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे. ग्रा़पं़ कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने कामकाज जि.प. शाळेच्या इमारतीतून सुरू होते. २००८-०९ मध्ये जि.प. अंतर्गत बाराव्या वित्त आयोगातून गावात ग्रामपंचायत भवन बांधण्यात आले. त्या कामाचे भूमिपूजन आमदार अमर काळे यांच्या हस्ते झाले होते़ तेव्हापासून गावात ग्रा़पं़ चे कामकाज सुरळीत सुरू होते़ आता २०१४-१५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून दुसऱ्या ग्रा़पं़ भवनासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला़ या कामाचे भूमिपूजन माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते झाले़
तालुक्यातील माटोडा (बेनोडा) ही धनोडी, एकलारा, माटोडा व बेनोडा या चार गावांमिळून मोठी ग्रामपंचायत आहे़ या गावाला अद्यापही हक्काची ग्रामपंचायत इमारत प्राप्त झालेली नाही़ कार्यालय नसलेल्या गावांत ग्रा़पं़ भवन निर्माण होणे गरजेचे असताना एकाच गावात दोन भवनांची निर्मिती केली जात आहे़ हा प्रकार थांबवून ग्रामपंचायत भवन नसलेल्या गावांत इमारतीचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे़